• Sat. Sep 21st, 2024
‘समृद्धी’मुळे शाळेत जाण्याच्या वाटेत मोठा खड्डा; JCBवर बसून मुलांना पार करावा लागतोय रस्ता

शहापूर : समृद्धी मार्गाच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यांमुळे शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याचे दृश्य कॅमेरामध्ये कैद झाले आहे. या शाळकरी मुलांना रस्ता ओलांडण्यासाठी जेसीबीचा सहारा घ्यावा लागला आहे. आपण पाहत असलेले हे दृश्य शहापूर तालुक्यातील आहे.
वारी समतेची, दिंडीवर मशिदीतून फुलांचा वर्षाव, छत्रपती संभाजीनगरमध्ये गावकऱ्यांचं हिंदू मुस्लीम ऐक्याचं पाऊल
शहापूर येथील काष्ठी, विंचू पाड्यासह दोन पाड्यांचा संपर्क तुटला आहे. शहापूर तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी मार्गाचा काम पुर्ण तत्वावर आले असून हा महामार्ग बनवताना अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आलेले आहेत. मात्र सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खोदकाम केलेल्या खड्ड्यांना नदी, नाले, तलावाचे स्वरूप आले आहे. याठिकाणी कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केली गेली नाही.

काजू, सुपारीच्या कोकणात आता चहाची लागवडही जोमात; अनोख्या प्रयोगाला निसर्गाचीही भक्कम साथ

हा रहदारीचा रस्ता असून तो रस्ता खोदल्याने उन्हाळ्यात स्थानिक कसेबसे रस्ता ओलांडत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे समृद्धीमार्गा लगत नदी, नाले, तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या पाड्यातील लोकांना खरेदीसाठी दुसऱ्या पाड्यातील बाजारपेठेत जावे लागते. तसेच शाळकरी मुलांच्या शाळेचा प्रवास देखील याच रस्त्यावरून करावा लागतो. मात्र आता हाच प्रवास पावसामुळे जीवघेणा झाला आहे. त्यामुळे यावर तत्काळ याची उपाययोजना करावी अशी मागणी पाड्यातील लोकांकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed