• Sat. Sep 21st, 2024

Pune News: पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर चीड आणणारा प्रकार, लेशपाल जवळगेने मुलीची जात विचारणाऱ्यांना खडसावले

Pune News: पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर चीड आणणारा प्रकार, लेशपाल जवळगेने मुलीची जात विचारणाऱ्यांना खडसावले

पुणे: पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव पेठेत मंगळवारी एका महाविद्यालयीन तरुणीवर एका माथेफिरु युवकाने कोयत्याने हल्ला केला. माथेफिरु युवक तिला डोक्यात कोयता घालून ठार मारणार इतक्यात त्याठिकाणी असलेल्या लेशपाल जवळगे तरुणीच्या मदतीला धावून आला. लेशपाल जवळगे याने माथेफिरु तरुणाचा कोयत्याचा वार अडवला आणि नंतर त्याच्या हातातून कोयता हिसकावून घेतला. यानंतर इतरजण त्याच्या मदतीला आले आणि त्यांनी माथेफिरु तरुणाला पकडून पोलिसांच्या हवाली केले. लेशपाल जवळगे याने धाडस दाखवून तरुणीला वाचवले. त्याच्या या कृतीचे समाजातील सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे. मात्र, त्याचवेळी एक चीड आणणारा प्रकारही समोर आला आहे. या हल्ल्याच्या घटनेत मुलीविषयी सहानुभूती व्यक्ती करणे किंवा अशाप्रकारच्या हल्ल्यांविषयी चीड व्यक्त करणे सोडा, पण काही संकुचित विचारसरणीच्या लोकांना जात महत्त्वाची वाटत आहे. या महाभागांनी इन्स्टाग्रामवर लेशपाल याला संबंधित मुलगी कोणत्या जातीची होती, असा प्रश्न विचारला.

लेशपाल जवळगे याने या सगळ्या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला. लेशपाल याने इन्स्टाग्रामला स्टेटस ठेवून या सगळ्यांना फटकारले होते. त्या मुलीची आणि मुलाची जात कुठली होती असं मला DM करुन विचारणाऱ्या सडक्या बुद्धिजीवांनो विनंती आहे की, ते मेसेज डिलीट करा. ना तुम्ही तुमच्या जातीचे होऊ शकता ना ही समाजाचे, कीड लागली आहे, तुमच्या वरच्या थोड्याफार असलेल्या भागाला, असे लेशपाल जवळगे याने आपल्या स्टेटसमध्ये म्हटले आहे.

लेशपालचं कौतुक, पण बघ्यांचं आश्चर्य; पुण्यात तरुणीवरील कोयता हल्ल्यावरुन राज ठाकरेंच्या सूचना

लेशपाल घरी जाऊन दीड तास ढसाढसा रडला

लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघा तरुणांचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्यांना जागोजागी सत्कारासाठी बोलावलं जात आहे. पण हे असं कौतुक करु नका, अशी विनंती लेशपाल जवळगे याने केली आहे. “सगळीकडून कौतुक होतंय खरं, पण हे माझं कर्तव्य होतं. उलट तुम्ही माझं कौतुक करुन उपकाराची भावना दाखवताय… मी त्या ताईवर उपकार केले नाहीत. तर मी माझं कर्तव्य पार पाडलं. तरीही सर्वांचे खूप खूप आभार…” अशा भावना लेशपाल जवळगेने फेसबुक पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या आहेत.

Leshpal Javalge Insta

“या घटनेनंतर खूप फोन येत आहेत. सगळे सत्काराला बोलवत आहेत. पण ती घटना घडली, तेव्हा त्या मुलाला पोलीस स्टेशनला दिल्यानंतर मी रूमवर गेलो आणि एक-दीड तास रडत होतो. थोडा उशीर झाला असता तर तिचा मृत्यू कसा झाला, हे मला लोकांना सांगावं लागलं असतं. मी फक्त माझं कर्तव्य बजावलं. हात जोडतो, पण मला आता सत्काराला बोलावू नका” असं आवाहन लेशपालने केलं आहे.

पुण्यात भर दिवसा भर रस्त्यात तरुणीवर कोयत्याने वार, २ तरुणांमुळे सुदैवाने वाचले प्राण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed