• Sat. Sep 21st, 2024

ब्रेपअप नंतरही तो तरुणीला त्रास देत होता, अखेर तिने भावाला सांगितलं अन् पुढे आक्रित घडलं

ब्रेपअप नंतरही तो तरुणीला त्रास देत होता, अखेर तिने भावाला सांगितलं अन् पुढे आक्रित घडलं

नागपूर : ब्रेकअप झाल्यानंतरही तरुणीचा पूर्व प्रेमी तिला लग्नासाठी सतत त्रास देत होता. याबाबत तरुणीने तिच्या भावाला माहिती दिली. भावाने तरुणाला समजावून सांगितले. मात्र तरीही बहिणीचा पूर्व प्रेमी ऐकत नव्हता. तरुणीला वारंवार त्रास देवून लग्नासाठी तगादा लावला होता. बहिणीला होणाऱ्या त्रासामुळे तरुणीच्या भावाने मित्रांसह तरुणावर हल्ला केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान बुधवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अजनी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
नोकरी मिळवून देण्यासाठी महिलेला भेटायला बोलावलं, मित्रा सोबत मिळून केला धक्कादायक प्रकार
पोलिसांकडून या प्रकरणी माहिती मिळाली आहे. निखिल उके ( २९ वय, राहणार रमाई नगर ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपींमध्ये हिमांशू मून, अंकित वाघमारे आणि विशाल फुलमाळी यांचा समावेश आहे. वास्तविक आरोपी हिमांशू मूनच्या बहिणीचे निखिल उकेसोबत गेल्या ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. हे दोघे एकमेकांशी लग्नही करणार होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचे नाते तुटले आणि मुलीने लग्नास नकार दिला.
हवालदाराने रागात विजेच्या डीपीत हात घातला, एकदा वाचला, उठून पुन्हा हात लावला अन् खेळ संपला
असे असतानाही निखिल तिच्यावर लग्नासाठी वारंवार दबाव टाकू लागला. मुलीने हा प्रकार तिचा भाऊ हिमांशूला सांगितला. हिमांशूने काल रात्री फोन करून निखिलला घराजवळ बोलावून समजावून सांगितले होते. त्याचवेळी त्यांची एकमेकांशी हाणामारी झाली आणि याच भांडणात हिमांशूने त्याच्या अन्य दोन साथीदारांसह निखिलवर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पळ काढला.

ग्रामीण पोलिसांच्या वायरलेस विभागात अधिकारी दारू पिऊन ड्युटीवर; पोलीस कर्मचाऱ्यासोबत अरेरावी

मारहाणीत जखमी झालेला निखिल हा हिमांशूच्या घरी पोहोचला आणि त्यानंतर त्याच्या पूर्व गर्लफ्रेंडनेच निखिलच्या आईला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. निखिलच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed