३३ रुपयांचा दाखला पण…
शाळांचे नवे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांना नव्या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी रहिवासी व उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्राची गरज असते. या प्रत्येक प्रमाणपत्रासाठी सेवा केंद्रात विद्यार्थी आणि पालकांची गर्दी वाढली आहे. पूर्वी जिल्हा व तालुका पातळीवर एक असे सेवा सेवा केंद्र होते. पण, गर्दी वाढल्याने खासगीस्तरावर आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये उत्पन्नाच्या दाखलल्यासाठी ३३ रुपये ६० पैशांचा शासकीय दर असला तरी ८० रुपये द्यावे लागतात. आजच दाखल हवा असल्यास ही रक्कम वाढते.
यवतमाळात ९८४ केंद्र सुरू
यवतमाळ जिल्ह्यात मुख्यालयासह प्रत्येक तालुक्यात सुरुवातीला १८ सेतू सुविधा केंद्र उघडण्यात आले. मागणी वाढल्याने ही संख्या १ हजार ५८१ केंद्रांवर पोहचली. आज ९८४ केंद्र सुरू आहेत.
पालकाची व्यथा…
मुलाच्या शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक दाखले घेण्यासाठी मुलासह तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या सेतू सुविधा केंद्रात गेले. दाखले घेण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती. सर्व्हर डाऊन असल्याने दिवसभर बसावे लागले. दलाल अधिक प्रमाणात सक्रिय आहेत. यांना पैसे दिल्यास काम लवकर होते, असे यवतमाळ नगर परिषदेचे माजी सभापती नितीन गिरी यांनी सांगितले.
तक्रारच नाही, आम्ही काय करावे?
इंटरनेटची समस्या असल्याने सर्व्हर डाउन होतो. सर्वांनाच त्रास होत आहे. कोणत्या दाखल्याचे व प्रमाणपत्राचे किती शुल्क आहे हे सर्व सेतू सेवा केंद्रात ठळक अक्षरात लिहिले आहे. नागरिकांना जास्त पैसे मागितल्यास त्यांनी जागरूक राहून त्याची तक्रार केली पाहिजे. तक्रार आली तर आम्ही संबंधित केंद्र संचालकांवर कारवाई करू. पण, तक्रार नसल्यास आम्ही काय करणार, असे सेतू सुविधा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक फिरोज पठाण म्हणाले.
सुविधांची यादी…
प्रमाणपत्र ———–कालावधी —————-शुल्क
– ७/१२ संगणीकृत ……………………१ दिवस……………………२३.६० रुपये
– नमुना ८ अ …………………… १ दिवस…………………… २३.६० रुपये
– सर्व प्रकारची प्रतिज्ञापत्रे ……………………१ दिवस……………………३३.६० रुपये
– उत्पन्नाचा दाखला……………………१५ दिवस…………………… ३३.६० रुपये
– रहिवासी दाखला ……………………१५ दिवस……………………३३.६० रुपये
– ज्येष्ठ नागरिक दाखला ……………………७ दिवस …………………… ३३.६० रुपये
– वय, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला……. १५ दिवस………………. ३३.६० रुपये
– जातीचा दाखला………………………… ४५ दिवस ………….. ५७.२० रुपये
– नॉन क्रिमीलेअर……………………… २१ दिवस…………………… ५७.२० रुपये
– महिला आरक्षण……………………… १५ दिवस……………………… ३३.६० रुपये
– ऐपतदार दाखला………………………२१ दिवस……………………… ३३.६० रुपये