• Sat. Sep 21st, 2024
Maharashtra Monsoon : राज्यावर पावसाचं सावट, उद्या मुंबईला येलो तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई : राज्यात रखडलेला मान्सून आता जोरदार सक्रीय झाला असून मान्सून हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने मुसळधार बरसण्यास सुरुवात केली आहे. अशात आज राज्याला ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला असून आता हवामान खात्याने उद्यासाठीही महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. खरंतर, मुंबईसह उपनगरांत, रायगड, पुणे, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात यामुळे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशात राज्यासाठी पुढचे ३-४ तास महत्त्वाचे आहेत.मुंबई वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, २८ जूनला ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Pune Crime: रिलेशनमध्ये भांडणं, ब्रेकअपनंतरही सनकी तरूणाची एकच मागणी; सदाशिव पेठेतील घटनेचं धक्कादायक सत्य

राज्याला ऑरेंज आणि येलो अलर्ट

दरम्यान, आज दिवसभरात नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पाऊस होईल अशी शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्येदेखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा हवामान खात्याचा इशारा आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्यामुळे २७ आणि २८ जून रोजी राज्यात ऑरेंज आणि येलो अलर्ट असणार आहे तर महाराष्ट्रातील कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या भागांमध्ये तर विदर्भातही अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आगे. दरम्यान, २९ आणि ३० जूनला महाराष्ट्रात तुफान पाऊस होईल. पण यावेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला नाही.

Maharashtra Monsoon : राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट, मुंबई, पुण्यासह ७ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

‘या’ भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

खरंतर, गेल्या २४ तासात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस बरसला. तर, आज मंगळवारीही मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह, पुणे, संपूर्ण कोकण, ठाणे, मध्य महाराष्ट्र, नाशिक आणि साताऱ्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भाच्या काही भागांतही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर काही भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

मंगळवारी विदर्भातील अमरावती, नागपूर परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर भंडारा आणि गोंदिया भागात तुरळक ठिकाणी अती तीव्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात विदर्भात मेघगर्जनेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Crime Diary: जाताना दोघे येताना एकटाच, लग्नाचं प्रपोज, प्रेमभंग, झटापट अन् रक्तपात; दर्शना मर्डर केसबद्दल सगळं काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed