विशेष लेख
दिल्ली-मुंबई औद्योगिक काॅरीडॉर निर्मितीसाठी दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरीडॉर विकास महामंडाळाची (DMIC) स्थापना केंद्र शासनातर्फे करण्यात आली आहे. या औद्योगिक कॉरीडारमध्ये उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्याचा समावेश आहे. सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा बिडकीन औद्योगिक प्रक्षेत्राचा या कॉरीडारमध्ये समावेश झालेला असल्याने राज्याच्या औद्योगिक विकासाचा सुवर्णमध्य औरंगाबादच्या उद्योग नगराने साध्य झाला आहे.
औद्योगिक विकासाचा सुवर्णमध्य – ऑरिक सिटी या प्रक्षेत्रावर विकास होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळ व दिल्ली मुंबई औद्योगिक महाद्वार महामंडळाचे यात 51:49 प्रमाणात भांडवली गुंतवणूक करण्याच्या हेतूने महाराष्ट्र इंडस्ट्रीयल टाऊनशिप लि. औरंगाबाद औद्योगिक महानगर लि. (MITL) ही कंपनी स्थापन झाली आहे. शेंद्रा बिडकीन प्रक्षेत्रासाठी ‘ऑरिक’ नावाचा ब्रँड म्हणुन वापर होत आहे. यातील ऑरिक नावामध्ये औरंगाबाद औद्योगिक शहर (Aurangabad Industrial City) ही अक्षरे समाविष्ट आहेत. शेंद्रा बिडकीन औद्योगिक क्षेत्र म्हणजेच ऑरिक सिटी ही औद्योगिक विकासाचे भविष्यातील सोनेरी द्वार ठरणार आहे.
शेंद्रा बिडकीन औद्योगिक प्रक्षेत्रासाठी पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 4 हजार हे.आर म्हणजे 10 हजार एकर जमिनीवर औद्योगिक विकास करण्याचा हेतू आहे. यातून मराठवाड्यातील लघु उद्योगास देखील चालना मिळत आहे. रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर निर्माण झाल्या आहेत.
लघु उद्योगास चालना– ऑरिक सिटीचा हा स्मार्ट इंडस्ट्रीयल सिटी च्या धर्तीवर होत आहे. यामध्ये 60 टक्के जमीन ही इंडस्ट्रीयल तर राहिलेल्या 40 टक्के जमीनीवर व्यावसायिक व औद्योगिक वापर, दवाखाने, शाँपीग कॉम्पलेक्स, मॉल्स, हॉटेल इ. चा समावेश करण्यात आला आहे. यामुळे एकत्रित विकासाची साधाने एकाच ठिकाणी उपलब्ध झाली. यामुळे जागतिक दर्जाची वाणिज्यदूतांची परिषदही या ठिकाणी संपन्न झाली. जी-20 च्या गटाची महिला गटाची परिषद आणि दौरा देखील येथील उद्योगातील महिलांचा सहभाग वाढवणारी ठरणार आहे.
या औद्योगिक प्रक्षेत्रामध्ये सर्व पायाभूत बरोबरच सुविधा (पाणी, विद्युत, सांडपाणी, फायर लाईन, इंटरनेट लाईन इ.) या भूमीगत स्वरुपात असून या सर्व सुविधा प्रत्येक भूखंडधारकाच्या भूखंडापर्यंत देण्यात आलेल्या आहेत. यामुळे एकात्रित विकासाची साधने एकाच ठिकाणी उपलब्ध झाली. यामुळे जागतिक दर्जाची वाणिज्य दूतांची परिषदही या ठिकाणी संपन्न झाली. जी-20 सारच्या गटाची माहिला कार्यागटाची परिषद आणि दौरा देखील येथील उद्योगातील महिलांचा सहभाग वाढवणारी ठरणार आहे.
प्रकल्पासाठी लागणारे सुमारे 42 टक्के पाणी हे सांडपाणी प्रक्रिया करुन वापरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उद्योगासाठी नवीन पाणीपुरवठा योजना अंतर्गत अतिरिक्त पाण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामुळे पारदर्शी पद्धतीने भूखंडवाटपासाठी ई-गव्हर्नस व ई-लँड मँनेजमेंट याचा वापर करुन 200 भूखंड वाटप करण्यात आलेले आहेत. याचा उपयोग विविध उद्योग समूह नवीन उद्योग आणून विविधता आणली गेली.
ऑरिक येथील भूखंडधारकांना सर्व प्रश्नासाठी सिंगल विंडो सुविधा आहे. मैत्री सारख्या उपक्रमातुन उद्योगास राज्यात विविध लागणारे परवाने एकाच ठिकाणी तसेच SCDA सिस्टिम CCTV कॅमेरे, प्रदूषण मापक सेन्सॉर, ट्रॅफिक कंट्रोल सिस्टिम इ. देण्यात आल्याने वेळ आणि खर्च यामध्ये बचत झाली आहे. अनेक अत्याधुनिक वापरासाठी याचा उपयोग गुणवत्तापूर्ण औद्योगिक वापरासाठी व सेवा उपलब्धतेसाठी होऊ शकतो.
सार्वजनिक ठिकाणी वाय. फाय, एकत्रित सेट्रल नियंत्रण कक्ष, भूमिगत संरचना, स्मार्ट स्ट्रीट लाईट आवश्यक सार्वजनिक सुविधांची पाहणी करण्यासाठी सेन्सर समाविष्ट असतील. यामुळे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यात ऑरिक सिटीचा महत्तवपूर्ण वाटा आहे.
ऑरिकच्या प्रशासकीय कामासाठी ठेवण्यात आलेले, तसेच इतर 4 मजले हे IT कंपनीज किंवा ऑरिक मधील कंपन्याचे ऑफिसेस इ. साठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
परकीय गुंतवणूकीस आकर्षण केंद्र
- ऑरिक सिटीमध्ये बाहेर देशातील कंपन्यानी गुंतवणुक केली असून यामध्ये मुख्यत्वे ह्योसुंग (साऊथ कोरिया), फुजी सिल्व्हरटेक (जपान), यन यल यम के (रशिया), ओयरलिकॉन बाल्झार (स्विस) पर्किन्स् अशा मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत.
- आज पर्यंत ऑरिक सिटी मध्ये 200 कंपन्यानी 5430 करोड रुपयांची गुंतवणूक केली असून यामधून 7895 रोजगारनिर्मिती झाली आहे.
या प्रक्षेत्राच्या पूर्ण विकासातून सुमारे 3 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी ऑरिक सिटी ही प्रमुख आकर्षणाचे केंद्र बनले असुन, शासनाच्या विकासात्मक योजनेचा प्रमुख भाग बनली आहे. पंचताराकिंत औद्योगिक वसाहतीला रस्ते, विमान, रेल्वे वाहतुकीने देखील जोडले गेले आहे. यामुळे उद्योजकाचे प्रमुख आकर्षणाचे आणि गुंतवणुकीचे आकर्षणचे ठिकाण ऑरिक सिटी ठरले आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबईही राज्यांतर्गत वाहतूक सुविधा उद्योंगाचा कच्चामाल पुरवठा करण्यासाठी साहयभूत झाला आहे. शेतकरी ते उद्योजक या प्रवासातील ऑरिक उद्योगक्षेत्र एक वेगावान प्रगती पथावरील दिशादर्शक ठिकाण आहे.
डॉ.मीरा ढास
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, औरंगाबाद
*****