यावेळी संभाजी भिडे म्हणाले आहेत की, जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी १८९८ रोजी हे राष्ट्रगीत इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहले होते. त्यामुळे १५ ऑगस्ट हा आपला खरा स्वातंत्र्य दिवस नाही. उलट या दिवशी भारताची फाळणी झाली होती. त्यामुळे या दिवशी सर्वांनी उपवास करून दुखवटा पाळावा असे भिडे म्हणालेत. भारताचा राष्ट्रध्वज जोपर्यंत भगवा म्हणून स्विकारला जात नाही, तोपर्यंत शांत बसायंच नमस्कार नाही. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाईसारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असल्याचे भिडे म्हणाले आहेत. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संभाजी भिडेंचा राष्ट्रगीतावर का आहे आक्षेप ?
* रवींद्रनाथ टागोरांनी १९११ मध्ये केली ‘जन गण मन’ची रचना
* टागोरांनी रचलेल्या गीतात पाच कडवी, राष्ट्रगीत म्हणून एकच कडवं स्वीकारलं
* जन गण मन १९११ मध्ये भारतात भरलेल्या दिल्ली दरबारसाठी रचल्याचा आरोप
* हे गीत दिल्लीत भरलेल्या दरबारात ब्रिटन सम्राट जॉर्ज पंचमला समर्पित
* भारत सम्राट जाहीर केलं जातं होतं त्यासाठी गीत रचल्याचा आरोप
* टागोरांनी मात्र एका पत्रातून तेव्हा हे सर्व आरोप नाकारलेले आहेत.
१५ ऑगस्टला भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळालं, अखंड भारत पाहिल्यावरच आपल्या मनाचं समाधान होईल: देवेंद्र फडणवीस
संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर साहजिकच वाद निर्माण झाला. याविषयी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर फडणवीस यांनी म्हटले की, असं आहे की, भारताल राजकीय स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालं. देशाची फाळणी झाल्याचं शल्य आपल्या मनात आहे. आपल्या सगळ्यांना अखंड भारत पाहायचा आहे. अखंड भारत पाहू तेव्हाच आपल्या मनाचं समाधान होईल. याचा अर्थ १५ ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन नाही, असं कोणी त्या अर्थाने म्हणत असेल तर ते योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.