कल्याण: मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. बदलापूर – अंबरनाथ दरम्यान मालगाडीचं इंजिन खराब झाल्यामुळे हा खोळंबा झाला आहे. त्यामुळे सकाळी मुंबईकडे कामावर निघालेल्या नोकरदारांना उशीर झाला. मालगाडीचं इंजिन खराब झाल्यामुळे मध्यरेल्वे १० ते १५ मिनिटं उशिराने धावत आहे. दरम्यान ठाणे, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, कसारावरून लोकल चालू आहेत. तर कर्जत – कल्याण लोहमार्गावर मोठा परिणाम झाला आहे. लोकल एका मागोमाग उभ्या असलेल्या दिसल्या. आता मालगाडीचं इंजिन बाजूला केले असून मध्ये रेल्वे वाहतूक सुरळीत व्हायला थोडा वेळ जाईल.दोन दिवसांपूर्वी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस सुरु झाला आहे. कालपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. पहिल्याचं पावसात मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे नागरिक आणि प्रवासी यांनी संताप व्यक्त केला आहे. मालगाडीचं इंजिन खराब झाल्यामुळे इतर गाड्यांना उशिर झाला आहे.
पहिल्या पावसात इंजिन बिघडलं
सकाळी मुंबईत कामासाठी निघालेल्या नोकरदारांना याचा मोठा फटका बसला आहे. वेळेत ऑफिसला पोहोचता येणार नाही. अचानक खोळंबा झाल्यामुळे मध्य रेल्वेला गर्दी वाढली आहे.
कर्जत – बदलापूर दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प आहे तर अंबरनाथ ते सीएसएमटी सेवा सुरू आहे. बदलापूरला जाणाऱ्या लोकल अंबरनाथ स्थानकात थांबवून तिथूनच पुन्हा सीएसएमटीसाठी रवाना केल्या जात आहेत. बदलापूर रेल्वे स्थानकात मात्र ऐन पिक अवरमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे.