• Sat. Sep 21st, 2024
नवी मुंबईमध्ये झोपडी बांधण्याच्या वादातून हाणामारी, एपीएमसीतील घटना; आठ जणांकडून परस्परांविरोधात गुन्हे

Navi Mumbai News : एपीएमसीतील ग्रीन पार्क मध्ये बेकायदेशीररित्या झोपड्या बांधल्या जात आहेत. मात्र महापालिकेकडून यावर दुर्लक्ष केले जात आहे. येथे झोपडी बांधण्यावरूनच दोन गटांमध्ये जोरात हाणामारी झाली आहे.

 

Navi Mumbai Police Case
नवी मुंबईमध्ये झोपडी बांधण्याच्या वादातून हाणामारी, एपीएमसीतील घटना; आठ जणांकडून परस्परांविरोधात गुन्हे
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : एपीएमसीतील ग्रीन पार्क भागात झोपडी बांधण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या हाणामारीत दोन्ही गटांतील दोन जण जखमी झाले असून एपीएमसी पोलिसांनी हाणामारीच्या घटनेनंतर दोन्ही गटांतील एकूण आठ जणांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, एपीएमसीतील ग्रीन पार्कमध्ये भरदिवसा झोपड्या बांधून त्या विकल्या जात असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मानखुर्द येथील साठे नगर मध्ये राहणारी यास्मिन शेख (२७) ही एपीएमसीतील ग्रीन पार्क भागात झोपडी बांधून त्या ठिकाणी आईसह राहण्यास येणार होती. गत सोमवारी यास्मिन, पती नसरुद्दिन इस्लाम शेख आणि बहीण परवीन शेख यांच्या मदतीने ग्रीन पार्क येथे झोपडी बांधण्यासाठी गेली होती. झोपडी बांधण्याच्या व मध्ये येण्याजाण्यासाठी रस्ता ठेवण्याबाबत शेजारच्या झोपडीत राहणाऱ्या नूरी तौफिक खातून हिच्यासोबत यास्मिन बोलणी करणार होती. सोमवारी सायंकाळी नुरी खातून तसेच तिच्या ओळखीची पिंकी शेख व दोन महिला व दोन पुरुष यास्मिनजवळ बोलणी करण्यासाठी गेले होते. यावेळी यास्मिन व तिचे नातेवाईक तसेच नुरी खातून व तिचे नातेवाईक यांच्यामध्ये बोलणी सुरू असताना, त्यांच्यामध्ये वादावादी झाली.

पावसाच्या आगमनाने नवी मुंबईकर सुखावले; शहरातील अतिरिक्त पाणीकपात तूर्तास लांबणीवर
या वादाचे पर्यवसान भांडणात झाल्यानंतर दोन्ही गटातील महिला व पुरुष एकमेकांसोबत भिडले. त्यानंतर त्यांनी बुक्क्यांनी तसेच बांबू व लाकडी दांडक्याने एकमेकांना मारहाण केली. या मारहाणीत यास्मीनच्या डोक्यावर बांबूचा फटका लागल्याने ती जखमी झाली.
तसेच दुसऱ्या गटातील नुरीचा भाचा अरमान शेख याला लाकडी दांडका लागल्याने तोदेखील यात जखमी झाला. या घटनेनंतर एपीएमसी पोलिसांनी दोन्ही गटांतील आठ जणांविरोधात हाणामारीसह दंगल माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून काही जणांना ताब्यात घेतले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed