• Sat. Sep 21st, 2024

ठसका लागताच तोंडात धरलेली सेफ्टी पिन चिमुरडीच्या घशातून थेट श्वसननलिकेत गेली अन्..

ठसका लागताच तोंडात धरलेली सेफ्टी पिन चिमुरडीच्या घशातून थेट श्वसननलिकेत गेली अन्..

छत्रपती संभाजीनगर: एका लहान मुलीने सेफ्टी पिन गिळल्याची घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. बीड बायपास परिसरात राहणाऱ्या अकरा वर्षीय मुलीने ओढणीला लावलेली सेफ्टी पिन तोंडात धरली होती. याच वेळी तिला अचानक ठसका लागला आणि यावेळी तिने तोंडात धरलेली सेफ्टी पिन गिळली. सेफ्टी पिन श्वासनलिकेत अडकल्यामुळे मुलीला श्वास घेणे कठीण झाले. हा प्रकार लक्षात येताच मुलीच्या पालकांनी तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर डॉक्टरांनी ही सेफ्टी पिन बाहेर काढण्यात यश मिळवले.

पाणी साठवण्यासाठी घरासमोर हौद बांधला, त्याच हौदात अनर्थ घडला; हसता खेळता चिमुकला गेल्यानं संपूर्ण कुटुंब सुन्न

बीड बायपास परिसरामध्ये राहणारी अकरा वर्षीय राणी (नाव काल्पनिक आहे) कुटुंबीयांसोबत राहते दरम्यान शनिवारी सकाळी दहा ते अकरा वाजेच्या सुमारास राणी खेळत असताना तिने तोंडाला बांधण्यासाठी असलेला स्टोलला लावलेली तोंडात धरली यावेळी दिला ठसका लागला आणि तोंडात असलेली पिन तिने गिळून घेतली. पिन घशात अडकल्यामुळे श्वासनलिकेत गेली आणि यामुळे राणीला श्वास घेण्यासाठी अडचणी येऊ लागली. ही बाब तिच्या घरी कुटुंबीयांच्या लक्षात येत तिला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी डॉक्टरांनी एक्स-रे बघितला असता पिन अडकलेली आढळून आली. पिन उघडलेल्या अवस्थेत असल्यामुळे राणीला दुखापत होऊ शकते याची भीती डॉक्टरांना होती यामुळे कानात घसा विभागातील डॉक्टरांनी अनुभवाच्या जोरावरती तात्काळ उपचार सुरू करत श्वासनलिकेत अडकलेली पिन बाहेर काढली. यावेळी डॉक्टर शैलेश निकम भुलतज्ञ डॉक्टर सुचिता जोशी यांच्यासह सहकारी व कर्मचाऱ्यांनी पिन बाहेर काढण्यासाठी मदत केली यावेळी कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले.

Pune News: हृदयद्रावक! खेळताना अनर्थ घडला, दीड वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू; आई-वडिलांचा आक्रोश

लहान मुलं हाताला लागेल ती कुठलीही वस्तू तोंडात घालतात आणि यामुळे ती श्वसन नलिकेत अडकते. अशा कारणांमुळे अनेक रुग्ण रुग्णालयात येत आहेत, यामध्ये सेफ्टी गिळलेले रुग्ण अनेक वेळा येत असतात. यामुळे पालकांनी मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे. त्यांना कुठल्या गोष्टीपासून त्रास होऊ शकतो याची जाणीव करून दिली पाहिजे. जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील, असे आव्हान डॉक्टर शैलेश निकम यांनी केले.

ऊसतोड कामगाराच्या ५ वर्षांच्या लेकरानं अखेर बोअरवेलमध्येच जीव सोडला; एनडीआरएफचे आठ तासांचे प्रयत्न निष्फळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed