• Sat. Sep 21st, 2024
VIDEO : पहिल्याच पावसाने सोलापूरचं काय केलं पाहा, घरादारात पाणीच पाणी; वाहनंही वाहून गेली

सोलापूर : सोलापूर शहरात शनिवारी सायंकाळपासून पावसाची सुरुवात झाली आहे. दिवसभर कडक उन्हामुळे सोलापूरकरांची लाहीलाही झाली होती. मात्र, सायंकाळच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. पहिल्याच पावसात सोलापूरकर चिंब भिजले तर नाले तुंबल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. सोलापूर शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते. पण या स्मार्ट सिटीचा पावसाने फज्जा केला आहे.शहरातील गणेश पेट शॉपिंग सेंटर समोरील पेट्रोल पंप व त्याच्या आसपासच्या परिसरात नाले तुंबल्याने रस्त्याला नदीचा स्वरूप आले होते. रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी वाहने वाहून जात होती. दुचाकी धारक हे दोरी व लोखंडी अँगलच्या साहाय्याने वाहून जाणाऱ्या दुचाकी वाहनांना कसरतीने पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. रात्री साडेआठ वाजेपर्यंत ६९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Mumbai Rains: मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस सुरू; पुढच्या २४ तासांत या भागांना IMD कडून येलो अलर्ट

स्मार्ट सिटीतल्या नागरिकांची पहिल्याच पावसाने फजिती केली

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सोलापूर शहरातील गावठाण भाग स्मार्ट सिटीत परिवर्तित होत आहे. यंदाचा मान्सून सुरू होण्याअगोदर स्मार्ट सिटी प्रशासनाने अनेक कामे पूर्ण केली आहे. पण शनिवारी सायंकाळी मान्सूनच्या पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शनिवारी आलेल्या पावसाने स्मार्ट सिटीतल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. सात रस्ता, मंगळवार बाजार परिसर, जोडभावी, बाळीवेस, बस स्थानक, विजापूर वेस परिसर आदी भागातील रस्त्यावर वाहनधारकांना मोठी कसरत करत वाहने हकावी लागली.

हेही वाचा – Weather Alert : राज्यासाठी पुढचे ३-४ तास धोक्याचे, मुंबईसह १३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

शहरातील अनेक घरांत पाणी; दुचाकी वाहने वाहून जाताना नागरिक धावले…

सोलापूर शहरातील कोनापुरे चाळ, रेल्वे स्टेशन परिसर, नई जिंदगी परिसरात अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले होते. नालेसफाई न केल्याने घरांत पाणी आणि गटारीचे घाण पाणी घरात शिरले असा संताप अनेक नागरिक व्यक्त करत होते. कुटुंबातील लहान लेकरांपासून ज्येष्ठ नागरिक हे घरातील पाणी काढण्यात व्यस्त होते.

सोलापूर शहरातील मंगळवार बाजार परिसरात असलेल्या गणेश पेठ शॉपिंग सेंटर परिसरात नाले तुंबले होते. गणेश शॉपिंग सेंटर हे सोलापूर महानगरपालिकेने नाल्यावर बांधले आहे. शॉपिंग सेंटरसमोर पार्किंग केलेली वाहने ही पावसाच्या पाण्यात वाहून जात होती. नाल्याच्या दिशेने वाहून जाणाऱ्या वाहनांना दुचाकी धारक हे दोरीच्या साहाय्याने बाहेर काढत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed