• Sat. Sep 21st, 2024

Sameer Wankhede प्रकरणी लपवाछपवीचा खेळ थांबवा, सीबीआयला मुंबई हायकोर्टाचे खडे बोल

Sameer Wankhede प्रकरणी लपवाछपवीचा खेळ थांबवा, सीबीआयला मुंबई हायकोर्टाचे खडे बोल

Sameer Wankhede : मुंबई हायकोर्टात काल झालेल्या सुनावणीत समीर वानखेडे प्रकरणात सीबीआयला खडे बोल सुनावण्यात आले. लपवा छपवीचा खेळ थांबवा असं देखील कोर्टानं म्हटलं.

 

Sameer Wankhede
समीर वानखेडे

हायलाइट्स:

  • लपवाछपवीचा खेळ थांबवा
  • हायकोर्टाचे सीबीआयला खडे बोल
  • समीर वानखेडे प्रकरण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘समीर वानखेडे यांना फौजदारी दंड संहितेच्या कलम ४१-अ अन्वये नोटीस दिली असेल, तर अटक कारवाईचा प्रश्न येतो कुठे? मग न्यायालयाने अटकेपासून दिलेले अंतरिम संरक्षण काढण्याची मागणी वारंवार का केली जात आहे? अटक कारवाई आवश्यक बनल्याची परिस्थिती आहे का? सीबीआय न्यायालयात उघडपणे काही सांगत का नाही?’, असे प्रश्न उपस्थित करतानाच ‘लपवाछपवीचा खेळ थांबवा’, असे खडे बोलही मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला सुनावले.

तपासाची प्रगती दाखवण्यासाठी २८ जून रोजीच्या पुढील सुनावणीच्या वेळी केस डायरी सादर करा, असे निर्देशही न्या. अजय गडकरी व न्या. शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने सीबीआयला दिले. तसेच तोपर्यंत वानखेडे यांना पूर्वी दिलेले अंतरिम संरक्षण कायम ठेवले.
मुंबईकरांनो तुमचा प्रवास होणार गारेगार; कारण आता बेस्टच्या ताफ्यात या नवीन आठ बसेस दाखल
कोर्डिलिया क्रूझ अमलीपदार्थ प्रकरणाबाबत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला वाचवण्यासाठी त्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाचे प्रमुख व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) तत्कालीन प्रादेशिक संचालक समीर वानखेडे हे शाहरुखकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपांमुळे अडचणीत आले आहेत. एनसीबीच्या तक्रारीवरून सीबीआयने ११ मे रोजी वानखेडे व अन्य चार जणांविरोधात एफआयआर दाखल केला. मात्र, त्याविरोधात वानखेडे यांनी तातडीने याचिका केल्यानंतर त्यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून अंतरिम संरक्षण मिळाले. हे संरक्षण मागे घ्यावे, अशी विनंती सीबीआयतर्फे प्रत्येक सुनावणीच्या वेळी केली जाते.
भाजप विरोधी महाबैठकीत उद्धव ठाकरेंची आक्रमक भूमिका; आपण एकत्र आलो आहोत ते हा देश…
‘अटकेची कारवाई हा सीबीआयचा विशेषाधिकार आहे. अशीच विनंती सीबीआयने अॅड. कुलदीप पाटील यांच्यामार्फत शुक्रवारी पुन्हा केली. तेव्हा, ‘तुम्हाला कोणती कठोर कारवाई करायची आहे? अटक करण्याच्या निष्कर्षापर्यंत तपास संस्था आली आहे का? न्यायालयात ते सांगण्यापासून कचरत का आहात? हा लपवाछपवीचा खेळ थांबवा’, असे खडे बोल खंडपीठाने सुनावले. तेव्हा, अद्याप तपास प्राथमिक टप्प्यावर असून अटक कारवाईच्या निष्कर्षापर्यंत आलो नसल्याचे सीबीआयतर्फे न्यायालयात सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी आता पुढील सुनावणी २८ जूनला होणार आहे.
Monsoon 2023 : गुड न्यूज, पुढील आठवडा पावसाचा असणार, आयएमडीकडून अ‍ॅलर्ट जारी, विदर्भात मान्सून सक्रीय

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed