• Mon. Nov 25th, 2024

    Nashik News : नाशिकमधील वडाळा गावातून साडेचार लाखांचा गुटखा जप्त; तिघांना पोलिसांनी केली अटक

    Nashik News : नाशिकमधील वडाळा गावातून साडेचार लाखांचा गुटखा जप्त; तिघांना पोलिसांनी केली अटक

    Nashik News : नाशिकमधील वडाळा गावातून साडेचार लाखांचा गुटखा जप्त केला. गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी गजाआड केले.

     

    Nashik News : नाशिकमधील वडाळा गावातून साडेचार लाखांचा गुटखा जप्त; तिघांना पोलिसांनी केली अटक
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्यासह अशा गुटख्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत ४ लाख ४३ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.प्रतिबंधित गुटखा आणि अमली पदार्थांची विक्री होत असल्यास थेट कारवाई करीत गुन्हे दाखल करा असे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचे आदेश आहेत. वडाळा गावातून एक संशयित प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार मुक्तार शेख यांना मिळाली होती. ॲक्टिवा मोपेडवरून विमल पानमसाला, आरएमडी मसाला, एम सेन्टेड तंबाखू गोल्ड असा प्रतिबंधित गुटखा घेऊन जात असताना संशयित मोहम्मद साजिद मोहम्मद नासीर अन्सारी याला उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून ४९ हजार १५६ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. वडाळागावातून हा माल घेतल्याचे त्याने सांगितले.

    त्यानुसार पोलिसांनी संशयित मोहम्मद दिलशाद इस्लाममुद्दीन मलिक, मोहम्मद जुबेर रियासअली अन्सारी (दोघे रा. वडाळागाव) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या घरातून ४ लाख ४३ हजार ४२९ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. मोपेडसह प्रतिबंधित गुटखा असा ४ लाख ९२ हजार ५८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी येवाली महाले, सुरेश माळोदे, योगीराज गायकवाड, रामदास भडांगे, संदीप भांड, धनंजय शिंदे, मोतीराम चव्हाण, महेश साळुंके, मुक्तार शेख आदींनी ही कारवाई केली.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed