• Mon. Nov 25th, 2024
    Nagpur News : गोरेवाडा तलावात हजारो मृत मासे; महापालिका घेणार कारणांचा शोध

    म.टा.प्रतिनिधी, नागपूर : गोरेवाडा तलावात गेल्या दोन दिवसांपासून मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याने खळबळ उडाली आहे. हा घातपाताचा प्रकार नसल्याचे नागपूर महापालिकेने आधीच स्पष्ट केले असून, वाढलेल्या तापमानामुळे हा प्रकार घडल्याचा दावा केला आहे. तरी, महापालिका नेमक्या कारणांचा शोध घेणार आहे.शहरात गेल्या काही दिवसांमध्ये तापमानात मोठी वाढ झाल्याने उष्णता वाढली. उष्ण व आर्द्र वातावरणामुळे मासळ्यांना त्रास झाला. तलावातील पाणी गरम होत असल्याने यातील ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते. त्याचबरोबर बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढल्याने हा प्रकार घडल्याचे महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील (माफसू) तज्ज्ञांनी सांगितले. महापालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांनीही याला दुजोरा दिला आहे.

    हजारो मृत मासे पाण्यावर तरंगताना या परिसरात सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्यांना दिसले. त्यामुळे खळबळ उडाली. नागरिकांकडून याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. दोन दिवसांपासून हा प्रकार घडत असून मृत माशांमुळे या ठिकाणी दुर्गंधी निर्माण झाली आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप याठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांनी केला आहे. दुसरीकडे, या तलावातून नियमितपणे पाण्याचे पम्पिंग सुरू आहे. त्यामुळे कुठलाही गैरप्रकार याठिकाणी होण्याची काहीच शक्यता नाही, असे श्वेता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

    आर. आर. आबांचा लेक शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाची अवस्था पाहून अस्वस्थ, स्वच्छतेचा प्रश्न मांडला अन् …
    शवविच्छेदनाची मागणी

    शहरातील जलस्रोतांचे संवर्धन करण्यात महापालिका फारशी गंभीर नसल्याच्या मुद्द्याकडे ‘मटा’ने वेळोवेळी लक्ष वेधले आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रीन व्हिजील संस्थेचे कौस्तव चॅटर्जी यांच्यानुसार, शहरातील तलावांमध्ये उष्णता वाढून मासे मरण्याचा हा प्रकार नवा नाही. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याने हा प्रकार घडतो. जलस्रोतांमध्ये येणाऱ्या दूषित पाण्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाण्याचे नमुने घेऊन मासे नेमके कशामुळे मरत आहेत, याचा शोध घेण्यासाठी त्यांचे शवविच्छेदन करण्यात यावे, त्यानंतरच नेमके कारण कळू शकेल, असेही चॅटर्जी यांनी स्पष्ट केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed