• Mon. Nov 25th, 2024
    आजीने पुजेसाठी फुलं आणायला पाठवलं, काही वेळात नात रडत-रडत आली घरी; विचारताच कुटुंब हादरलं…

    सोलापूर : सोलापुरातील महिला आणि मुली असुरक्षित असल्याचं जिवंत उदाहरण समोर आलं आहे. आजीने नातीला पूजेसाठी फुलं घेऊन ये असे सांगितले होतं. पीडित ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी १०० रुपयांची नोट घेऊन मधला मारुती येथील बाजारपेठेत फुलारीच्या दुकानात सोमवारी सकाळी गेली होती. फुलारीने शंभर रुपयांचे सुट्टे नाहीत असे सांगून परत पाठवले. ती अल्पवयीन ११ वर्षीय मुलगी परत जाताना असं काही घडलं की यामुळे गावात संतापाची लाट आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तिला एका संशयित इसमाने झोंबाझोंबी सुरू केली. अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीने प्रतिकार करून, स्वतःची सुटका करून घेतली आणि पळत घरी जाऊन आईला रडत-रडत माहिती सांगितली. त्या संबंधित इसमाचा शोध घेतला असता घटनास्थळवरून संशयित इसम फरार झाला होता. अल्पवयीन मुलीच्या आई व आजीने सोमवारी रात्री फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

    Pune Crime: दर्शनाने MPSC गाजवून सत्कार घेतला, मित्रासोबत रायगडावर गेली अन् पुढे…; टॉपर पोरीसोबत काय झालं?

    सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती…

    अल्पवयीन मुलीला ओढताना तिच्यासोबत झोंबाझोंबी करताना सर्व दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस संशयित इसमाचा शोध घेत आहेत. पीडित मुलीच्या आजीला सोमवारी सकाळी पूजेला फुलं पाहिजे होती. आजीने आपल्या नातीला फुलं आणण्यास शंभर रुपये दिले व जवळच असलेल्या मधला मारुती येथील फुलारी गल्लीत जाऊन फुलं घेऊन ये असे सांगितले होते. पीडिता ही पिशवी घेऊन फुलं आणण्यासाठी गेली होती. परंतू शंभर रुपयांचे सुट्टे नाहीत असे सांगून फुलारीने पीडितेला परत पाठवले.

    अल्पवयीन पीडित ही घरी परत जाताना, रस्ता निर्मनुष्य होता. सकाळची वेळ असल्याने वर्दळदेखील कमी होती. त्यावेळी एका संशयित इसमाने पीडितेला अडविण्याचा प्रयत्न केला. तिचा हात धरून तिला झोंबाझोंबी करत होता. त्यावेळी पेपर टाकणारा व्यक्ती येत आहे, हे पाहून संशयित इसमाने मुलीला सोडले.

    Crime Diary : मध्यरात्र, बंद खोली आणि सुंदर अनोळखी तरुणी; पुढे जे घडलं ते वाचून बसल्या जागी घाम फुटेल…

    अन्यथा मोठे अनर्थ घडला असता…

    निर्मनुष्य रस्त्यावरून जाताना पीडित अल्पवयीन मुलीने मोठ्या चलाखीने स्वतःची सुटका करून घेतली. मधला मारुती या परिसरात असलेल्या फुलांच्या बाजारपेठेत संशयित इसमाने एकट्या मुलीला पाहून हेरले होते. ऐनवेळी पेपरवाला आल्याने मोठी हानी टळली. सोलापुरातील रस्त्यावरून जाताना भीतीचे वातावरण पसरले आहे. महिला व मुली सुरक्षित नाहीत अशी खंत व्यक्त केली जात आहे. ही घटना होऊन २४ तास उलटले तरी संशयित आरोपी पोलिसांना सापडला नाही. पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहेत.

    Mumbai Crime: तुमचे फोटो असलेली पॉर्न साईटची लिंक दाखवणार, नंतर…; महिलेच्या तक्रारीने मुंबईत मोठा स्कॅम उघड

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed