• Sat. Sep 21st, 2024
जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला; दिंडीत सेवा करणाऱ्या वारकऱ्याचा मृत्यू, वारीत हळहळ

सातारा: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यात सरवडे (जि. कोल्हापूर) येथील आनंदा विठ्ठल व्हरकट ( वय ४९ वर्ष) या वारकऱ्याचा लोणंद येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. आज, सोमवारी सकाळच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडताना ही दुर्घटना घडली.

आनंदा विठ्ठल व्हरकट आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीत सहभागी झाले होते. वारीत ते ट्रक चालक म्हणून काम करत होते. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकं काय घडलं?

व्हरकट हे गेल्या अनेक वर्षांपासून गावातून जाणाऱ्या आळंदी ते पंढरपूर आषाढी पायी वारी दिंडीत सहभागी असायचे. यावर्षी देखील ते दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीत ट्रक चालवण्याची सेवा करीत होते. आज लोणंद येथे पहाटे उठल्यानंतर प्रातःविधीसाठी जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून चालले होते. त्याचवेळी रेल्वे आल्याने ते रेल्वेला धडकले अन् त्यात त्यांचा मृत्यू झाला.

शिवापूर मठाचे श्री काडसिद्धेश्वर स्वामींच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
अपघाताची नोंद रेल्वे पोलीस ठाण्यात झाली आहे. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

हातात काठी अन् चालताना होणार त्रास कशाचीच तमा नाही; ७८ वर्षीय आजी माऊलींच्या वारीत सहभागी

आळंदी ते पंढरपूर पायी वारी दिंडी सोहळा रविवारी लोणंद येथे विसावला. येथे दोन दिवस मुक्कामानंतर हा सोहळा मंगळवारी फलटण तालुक्यातील तरडगावला दुपारी मार्गस्थ होत आहे. लोणंद येथे वारकऱ्यांसाठी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. तसे प्रशासनाने चोख व्यवस्था ही केली आहे. मात्र, आज दुर्दैवाने ही घटना घडली आणि वारकऱ्याला आपला जीव गमवावा लागला.

पाण्यानेच ‘जीवन’ हिरावलं, आईच्या डोळ्यादेखत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
जेजुरी ते वाल्हे दरम्यान दिंडीतील वाहनाची ठोकर बसून एका वारकरी महिलेलाही जीव गमवावा लागला होता. दिंडीदरम्यान वारकऱ्यांनी रस्त्यावरून जाताना तसेच कालवा, विहिरी आदी ठिकाणी आंघोळीसाठी व इतर कामासाठी जात असताना काळजी घ्यावी, असे आवाहन दिंडीचालक, मालकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed