• Sat. Sep 21st, 2024

नागपूरमधील बेपत्ता असलेली तीन चिमुकली सापडली, पण सगळं संपलेलं, नेमकं काय घडलं?

नागपूरमधील बेपत्ता असलेली तीन चिमुकली सापडली, पण सगळं संपलेलं, नेमकं काय घडलं?

नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या फारुख नगर येथून बेपत्ता तीन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. घराजवळ उभ्या असलेल्या जुन्या कारमध्ये तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुले खेळत असताना कारमध्ये बसली आणि दरवाजा आतून लॉक केला. तिघांचाही उष्माघात आणि गुदमरून मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह पोलीस अधिकारी आणि पोलीस बल मोठ्या संख्येने तेथे पोहोचले.

तौफिक फिरोज खान (४), आलिया फिरोज खान (६) आणि आफरीन इर्शाद खान (६) हे तीनही मुलं शनिवारी दुपारी टेका नाका येथील फारुख नगर मैदानात खेळत असताना अचानक बेपत्ता झाली. उशिरापर्यंत मुले न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यामध्ये न सापडल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार पाचपावली पोलिसांत करण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी मुलांचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शोधमोहीम सुरू असताना, लोक तिथून जात असताना त्यांना तेथे उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी येत होती. यानंतर कार उघडली असता तेथे तीन मुलांचे मृतदेह दिसले. बालकांच्या मृतदेहाची माहिती तातडीने पाचपावली पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी तेथे पोहोचले.
RBI : ८८ हजार कोटींच्या ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्याचा दावा आरबीआयनं फेटाळला, काय घडलं ते सांगितलं

गाडी अनेक दिवस खराब उभी होती

मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये बिघाड झाला होता. आणि गेल्या अनेक दिवसांपासून कार तिथेच उभी होती. कारच्या दरवाजाही खराब होता. ही घटना ज्या भागात घडली तो विणकरांचा परिसर आहे. मृत मुलांचे पालकही विणकर आहेत. गुदमरून मुलांचा मृत्यू झाला असला तरी पोलिसांनी अपहरणाच्या कलम १७४ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Shishir Shinde : “शिशिर काका, बस करा हे” ठाकरेंची साथ सोडताच मनसे नेत्याचं ट्विट, कुणी दिला सल्ला?
दरम्यान, मुलांच्या मृत्यूनं कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यामुळं लहान मुलं खेळत असताना पालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
Manisha Kayande: मनिषा कायंदे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत, मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव, ठाकरेंवर टीकेचे बाण

एअर इंडियाच्या विमानाचं वेळापत्रक अखेरच्या क्षणी बदलल; नागपूर विमानतळावर प्रवाशांचा संताप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed