• Fri. Jul 31st, 2026

    APK File Scam: ‘एपीके’च्या सापळ्यातून 63 कोटींची लूट! 91 फाइलद्वारे 2993 जणांची फसवणूक; राज्यातील 512 जणांना फटका

    APK File Scam: ‘एपीके’च्या सापळ्यातून 63 कोटींची लूट! 91 फाइलद्वारे 2993 जणांची फसवणूक; राज्यातील 512 जणांना फटका

    APK File Scam: एपीके फाइलद्वारे आर्थिक लुबाडणुकीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली.

    apk file scam(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : सायबर फसवणुकीच्या एका गुन्ह्याचा तपास करताना दक्षिण मुंबईतील दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिसांनी झारखंडमधून एका तरुणाला अटक केली आहे. एस. के. मंडल असे आरोपीचे नाव असून, पदवीधर असलेल्या या तरुणाने सायबरचोरांना शेकडो एपीके फाइल विकल्याचा संशय आहे. पोलिसांना त्याच्याकडे ९६७ एपीके फाइल सापडल्या असून, त्याने विकलेल्या ९१ एपीके फाइलद्वारे ६३ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची लूट झाल्याचे तपासात समोर आले आहे.

    पोलिस उपायुक्त आर. रागसुधा यांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगर गॅस लिमिटेडच्या नावाने बनावट एपीके फाइल पाठवून ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका व्यक्तीने दादासाहेब भडकमकर मार्ग पोलिस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
    Maharashtra Timesधर्म पाहून कारवाई केली का? मुंबई हायकोर्टाचा पोलिसांना प्रश्न; तडीपारीचा आदेश रद्द
    वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक युवराज पाटील, सहायक निरीक्षक धनवेश पाटील, अभिजित देशमुख आणि उपनिरीक्षक किरण देवरे यांच्या पथकाने तपास सुरू केला. मोबाइल क्रमांक, एपीके फाइल आणि बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर पोलिसांचा तपास झारखंडपर्यंत पोहोचला. त्यानंतर झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये पाठलाग करून मंडल याला अटक करण्यात आली.

    तीन हजार नागरिकांना गंडा
    मंडल याची कसून चौकशी केल्यानंतर ९१ एपीके फाइलच्या माध्यमातून देशभरातील २,९९३ नागरिकांची फसवणूक झाल्याचे समोर आले. यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील ५१२ नागरिकांचा समावेश आहे. मंडल याच्याकडून पोलिसांनी १० मोबाइल फोन, एक लॅपटॉप, सात सिम कार्ड आणि चार डेबिट कार्ड जप्त केली आहेत.
    Maharashtra TimesIndian Railway: कन्फर्म तिकिटांसाठी बनावट VIP मार्ग; लोकभवनाच्या खोट्या शिक्क्यांचा वापर, सूत्रधारासह 3 रेल्वे एजंट अटकेत
    ३७ हजार नागरिकांचा डेटा हाती
    पोलिसांनी मंडल याच्याकडून जप्त केलेल्या सामग्रीत सुमारे ३७,२०० नागरिकांच्या बँक खात्यांचा डेटा सापडला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर बँक खात्यांचा तपशील मंडल याच्याकडे कसा आला, याचा तपास पोलिस करत आहेत. हा डेटा इतर सायबरचोरांकडेही पोहोचला असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    आरोपीकडे काय सापडले ?
    मोबाइल फोन : १०
    लॅपटॉप : १
    सिम कार्ड : ७
    डेबिट कार्ड : ४
    बँक खात्यांचा डेटा : सुमारे ३७,२०० नागरिकांचा

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा