• Sat. Sep 21st, 2024

काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गटाचे नेते भाजपच्या गळाला, फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश ठरले

काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गटाचे नेते भाजपच्या गळाला, फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश ठरले

कोल्हापूर : जिल्ह्यात भाजप अधिक बळकट करण्यासाठी पक्षाने आता इन्कमिंगची मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २७ जून रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, यामध्ये काही माजी आमदार, सहकारी संस्थांचे पदाधिकारी याशिवाय मोठे नेते गळाला लागल्याचा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार बैठकीत केला. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये निश्चितपणे होणार असून त्याची तयारी सुरू झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

धनंजय महाडिक यांच्या खासदारकीला एक वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीत वर्षभरात शहरासाठी ८० कोटी रुपये आणल्याचे सांगताना त्यांनी आणखी विकास कामे करण्यासाठी जनतेनेच कामे सुचवावीत असे आवाहन केले.

डॉक्टर काय सुरु आहे? तयारी सुरु ठेवा; मोहक हास्य सूचक सल्ला, पवारांच्या हाती काँग्रेस नेत्याचा हात
दरम्यान, करोना आणि इतर काही कारणामुळे अडीच वर्षे लांबलेली कोल्हापूर महापालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये निश्चितपणे होणार असल्याचे सांगून ते म्हणाले, राज्य पातळीवरून तसे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. यामुळे भाजपने त्याची जोरदार तयारी आतापासून सुरू केली आहे. महापालिकेची या पक्षाला एकदा सत्ता द्या, शहराला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवू अशी ग्वाही त्यांनी दिली.

आई शिवसेना तालुकाप्रमुख, बालशिवसैनिक म्हणून कारकीर्द सुरु, शाईफेक झालेल्या अयोध्या पौळ कोण?
जिल्ह्यात भाजप वाढवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधील अनेक नेत्यांच्या हातात कमळ देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत अनेक नेते गळाला लागल्याचा दावा करून ते म्हणाले, यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचीही काही नेते आहेत. गेले दोन महिने या सर्वांशी चर्चा सुरू होती, आता नावे निश्चित झाले आहेत. २७ जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सर्व नेत्यांचा भाजप प्रवेश घडवून आणण्यात येईल.

VIDEO| कुणाल राऊतांना विरोध, यूथ काँग्रेसच्या बैठकीत राडा, दोन गटांमध्ये खुर्च्यांची फेकाफेक
कोल्हापूर जिल्ह्यात दहा हजार मेगावॅटचा वीज प्रकल्प उभारण्यात येणार असून हैदराबादची एक कंपनी आणि राज्य सरकार यांच्यामध्ये याबाबत करार झाल्याचे सांगून महाडिक म्हणाले, यातून 3000 युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. चंदगड आजरा या भागात साधारणता दीड हजार एकर जागेत वीज निर्मितीचा हा प्रकल्प उभारण्यात येणार असून तो चार वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.

तुळजाभवानीच्या दर्शनानंतर मंत्रिमंडळ विस्तावरावर फडणवीसांचं उत्तर

भाजपचाच प्रचार करणार

शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक हे भाजपच्या चिन्हावर लढणार असल्याची चर्चा वेगावली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. या पार्श्वभूमीवर महाडिक यांना विचारले असता ते म्हणाले, भाजपच्या चिन्हावर कोणीही निवडणुकीला उभारले तर मी त्यांचाच प्रचार करणार. मी पक्षाचेच काम करणार. उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय पक्षी घेईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed