• Sat. Sep 21st, 2024
अबब! ६ मजली इमारतीऐवढा एस्केलेटर मुंबईत, अवघ्या २० मिनिटांत थेट मुंबई विमानतळावर करणार टच

मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, वाढती गर्दी पाहता भविष्यात मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी सरकारकडून मोठे प्रयत्न करण्यात येत आहे. अशात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने हवाई प्रवाशांना विमानतळावर सहज पोहोचता यावं यासाठी एक मोठी योजना आखली आहे. मेट्रो स्टेशनवर देशातला सगळ्यात उंच एस्केलेटर बसवण्याचा निर्णय MMRC ने T-2 (CSMIA) घेतला आहे. जेणेकरून हवाई मार्गे प्रवास करणाऱ्यांना सहज विमानतळ गाठता येईल.

६ मजली इमारतीइतकं उंच एस्केलेटर

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे एस्केलेटर ६ मजली इमारतीइतकं उंच असणार आहे. T-2 सत्राचं हे एस्केलेटर तब्बल १९.१५ मीटर असेल. तर मेट्रोला विमानतळाशी जोडणारे १९.१५ मीटरचे एकूण ८ एस्केलेटर बसवण्यात येणार असल्याची माहिती आहे. एमएमआरसीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली मेट्रोच्या एका स्थानकावर आतपर्यंतचं सर्वात उंच एस्केलेटर १५ मीटरचं आहे. पण मेट्रो-३ च्या टी-२ स्थानकावर १९.१५ मीटर उंच एस्केलेटर बसवल्यानंतर, सर्वाधिक प्रवासी एस्केलेटरचा विक्रमच असेल तो एमएमआरसीच्या नावावर असणार आहे.

Weather Alert : राज्यात मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा, तर कोणते जिल्हे तापणार; वाचा वेदर रिपोर्ट

एस्केलेटर बसवण्यासाठी २५० टन क्षमतेच्या क्रेनचा वापर

अधिक माहितीनुसार, ८ एस्केलेटरपैकी ४ एस्केलेटर बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तर स्टेशन परिसरात इतकं मोठं एस्केलेटर बसवण्यासाठी २५० टन क्षमतेच्या क्रेनचा वापर केला जात आहे. यासाठी कुलाबा-वांद्रे-सीप्झ दरम्यान ३३.५ किमी लांबीचा भूमिगत मेट्रो मार्ग तयार करण्यात येत आहे.

जमिनीच्या पृष्ठभागापासून हा मेट्रो मार्ग सुमारे १५ ते २० मीटरवर असेल. यामुळे एस्केलेटरच्या मदतीने विमान प्रवासी काही मिनिटांत भूगर्भातून विमानतळ परिसरात पोहोचू शकतील. खरंतर, मुंबई विमानतळ हे देशातील दुसरं सर्वात व्यस्त विमानतळ आहे. जिथे दररोज ९५० हून अधिक उड्डाणं घेतली जातात. विमान प्रवाशांसोबतच शेकडो लोकही त्यांच्या नातेवाईकांना विमानतळावर सोडण्यासाठी विमानतळावर पोहोचतात. यामुळे हे अगदी वर्दळीचं ठिकाण आहे.

मुंबईकरांसाठी Good News! २०२४ पर्यंत मिळणार नवं विमानतळ, सगळं असेल हायटेक; वाचा खास वैशिष्ट्ये

२० ते २५ मिनिटांत विमानतळावर पोहोचाल…

मेट्रो-३ कॉरिडॉरच्या योजनेमुळे दक्षिण मुंबईतील हवाई प्रवासी अवघ्या २० ते २५ मिनिटांत विमानतळावर पोहोचू शकतील. दरम्यान, दक्षिण मुंबईतून विमानतळावर पोहोचण्यासाठी सध्या एक ते दीड तास लागतो. अशात भविष्यात वाढणारी गर्दी पाहता प्रवाशांची सोय लक्षात घेऊन मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळही मेट्रोच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे.

मुंबई विमानतळावरून नवी मुंबई विमानतळावर अवघ्या ३० ते ४० मिनिटांत पोहोचणार

दोन्ही विमानतळांना जोडण्यासाठी तब्बल ३५ किमी लांबीचा मेट्रो कॉरिडॉर तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासाठी शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मानखुर्दपर्यंत मेट्रोच्या उभारणीची जबाबदारी एमएमआरडीएला देण्यात आली आहे तर सुमारे ११ किमीच्या मेट्रो मार्गाच्या बांधकामाची जबाबदारी सिडकोची असेल. हा मेट्रो मार्ग तयार झाल्यानंतर मुंबई विमानतळावरून नवी मुंबई विमानतळावर अवघ्या ३० ते ४० मिनिटांत पोहोचू शकाल. पण सध्या मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे दोन ते अडीच तासांचा कालावधी लागतो.

हेही वाचा – Dhirendra Shastri : तरुणी मनातल्या मनात सेटिंगबद्दल बोलली, भडकलेल्या बागेश्वर बाबांनी दरबारातच केलं ओपन चॅलेंज

कुठपर्यंत आलं प्रकल्पाचं काम…

मेट्रो-३ कॉरिडॉरचे काम ८२ टक्के पूर्ण झालं आहे. मेट्रो सेवा दोन टप्प्यात सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या अंतर्गत डिसेंबर २०२३ मध्ये आरे ते बीकेसी आणि जून २०२४ पासून बीकेसी ते कफ परेड अशी सेवा सुरू करण्याचा विचार आहे. अशात मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळादरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कॉरिडॉरच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.

Mumbai Crime: तुमचे फोटो असलेली पॉर्न साईटची लिंक दाखवणार, नंतर…; महिलेच्या तक्रारीने मुंबईत मोठा स्कॅम उघड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed