• Fri. Nov 29th, 2024
    माहूरच्या रेणुका माता मंदिरात भक्तांची मांदियाळी, एका महिन्यात तब्बल इतक्या लाखांचं दान

    अर्जुन राठोड, नांदेड : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ पीठ असलेल्या माहूर येथील श्री. रेणुका माता मंदिराला भक्तांनी भरभरून दान दिलं आहे. माहुरगडाच्या दानपेटीत एका महिन्यात तब्बल २२ लाख रुपयांचे दान जमा झालं आहे. प्रत्येक महिन्याला मंदिर प्रशासनाकडून श्री. रेणुका माता मंदिरातील दान पेटीतील ऐवजासह रोख रक्कमेची मोजणी केली जाते. यावेळी झालेल्या मोजणीत रोख रक्कम १० लाख १८ हजार ६३५ रुपये रक्कम आणि सोने १५ तोळे ८०० मिली तसेच चांदी ४ किलो ६३५ ग्रॅम दानपेटीत मिळून आलं आहे. रोख रक्कम आणि दागिने मिळून एकूण २२ लाखांचे दान भाविकांकडून दान पेटीत दान करण्यात आलं आहे. उन्हाळ्याच्या सुट्टयामुळे माहूरला भाविकांची गर्दी असून त्यातून दानपेटीत मोठी रक्कम जमा झाली आहे.

    उन्हाळी सुट्टीत महिनाभर भाविकांची गर्दी

    उन्हाळी सुट्यांमध्ये महिनाभर भाविक मोठ्यासंख्येने श्री. रेणुका मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर संस्थानच्या वतीने विशेष व्यवस्था केली होती. श्री. रेणुका मातेच्या दर्शनासोबतच भाविक अनुसया माता, दत्ता शिखर येथे ही जातात. तसेच येथील डोंगर आणि घनदाट झाडे, पशुपक्षी पर्यटकांना भुरळ घालते. त्यामुळे वर्षभरात उन्हाळी तसेच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देखील भाविक आवर्जून माहूरगडावर येतात.

    जाहिरातीच्या वादानंतर शिंदे-फडणवीस समोरासमोर, बॉडी लँग्वेजची चर्चा, पण भाषणात सगळ्याच कुशंका उडवून लावल्या
    माहूरच्या तांबुलला ‘जीआय टॅग’

    माहूरच्या रेणुकादेवी मंदिरात ‘विडा तांबुल’चे महत्त्व असून देवीच्या मुख्य नैवेद्यापैकी ‘तांबुल’ एक मानला जातो. देशभरातून माहूर येथे येणारे भाविक ‘तांबुल’चा प्रसाद आवडीने ग्रहण करतात. या ‘तांबुल’ला आता भौगोलिक नामांकन मिळालं आहे. विशेष म्हणजे पुरणपोळी नैवेद्यानंतर ‘तांबुल’ विड्याचा वापर करतात. नागवेलीपान आणि काथ या पासून ‘तांबुल’ बनवतात.

    रक्त शुद्धीकरणासाठी ‘तांबुल’ हे उपयुक्त आहे, असं मानलं जातं. ‘जिओग्राफिकल इंडिकेशन’ अर्थात ‘जीआय टॅग’ हा एक प्रकारचा लेबल आहे. जो कोणत्याही उत्पादनाच्या भौगोलिक ओळखीच्या रुपात दिला जातो. हा टॅग एखाद्या खास मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्टला किंवा कोणत्याही खास पिकाला किंवा नैसर्गिक उत्पादनाला दिला जातो. त्याची नोंद सरकार दरबारी घेतली जाते. माहूरच्या ‘तांबूल’ या देवीच्या नैवेद्याला हा टॅग मिळाल्याने जगभरात आता माहूरच्या ‘तांबूल’ची ओळख निर्माण होणार आहे.

    ‘स्काय वॉक’ आणि ‘लिफ्ट’च्या कामाला सुरुवात

    माहूर गडावर वसलेल्या श्री. रेणुका माता मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांना २४० पायऱ्या चढाव्या लागत होत्या. पण, आता भाविकांना ‘स्काय वॉक’ आणि ‘लिफ्ट’ने थेट मंदिरात जाता येणार आहे. यासाठी ५१.३ कोटी रुपये खर्चाच्या ‘स्काय वॉक’ (लिफ्टसह) प्रकल्पाचे नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.

    ‘स्कायवॉक’ तयार झाल्यानंतर सुलभपणामुळे ज्येष्ठ आणि दिव्यांगांची गैरसोय टळणार आहे. मंदिरात जाण्यासाठी चार कॅप्सूल लिफ्ट तयार करणार असून टेकडीच्या पायथ्याशी लिफ्ट स्थानक असणार आहे. एकावेळी एका लिफ्टमध्ये २० भाविकांचा समावेश होऊ शकतो. चार लिफ्टमधून एकावेळी एकूण ८० भाविक ये-जा करू शकतात. लवकरच हे काम पूर्ण होईल, असं सांगण्यात येत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed