• Sat. Sep 21st, 2024

रायगडाच्या पायथ्याजवळ दरड कोसळली, दुकानासह पर्यटकांच्या गाड्यांचं नुकसान, स्थानिक म्हणतात..

रायगडाच्या पायथ्याजवळ दरड कोसळली, दुकानासह पर्यटकांच्या गाड्यांचं नुकसान, स्थानिक म्हणतात..

रायगड : सोमवारी दुपारच्या सुमारास किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या चित्त दरवाजानजीक दरड कोसळली आहे. यावेळी, पायथ्याशी असलेल्या तीन कारचे नुकसान झाले असून सुदैवाने या अपघातात कुणी जखमी झालेले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

पावसाळ्याच्या हंगामाला काहीशी सुरुवात झाली असून रायगड जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्या आहेत. सोमवारी दुपारच्या सुमारास किल्ले रायगड परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या असून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास किल्ले रायगडाच्या पायथ्याशी दरड कोसळली होती. यावेळी, सुदैवाने कुणी जखमी झाले नसून चित्तदरवाजा जवळच्या मार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या आर्टिगा, स्विफ्ट आणि टाटा नेकसॉन कार्सचे नुकसान झाले आहे.

यामध्ये, किल्ल्यावरून आलेल्या दरडीमुळे आर्टिगा कारचा चक्काचूर झाला असून हे दगड समोरच्या छोट्या स्टोल्सवर जाऊन धडकले होते. यावेळी, सुमारे तीन ते चार फूट रुंदीच्या दरडी कोसळल्या पासूम सुदैवाने कुणी जखमी झाले नसल्याचे स्थानिक रहिवासी गणेश औकिरकर यांनी सांगितले आहे. तर, सोलापूर येथून आर्टिगा कारने किल्ले रायगडावर आलेल्या पर्यटकांच्या गाडीचे नुकसान झाले असून सुदैवाने कारचालक आणि पर्यटक हे किल्ल्यावर गेल्याने बचावले असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, या अपघातात अमर चव्हाण यांच्या दुकानाच्या भिंती तुटल्या असून त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

Warkari News : विठुरायाच्या दर्शनासाठी पंढपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी खूशखबर; सरकारने काढले महत्त्वाचे आदेश

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दरम्यान देखील दरड कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याने सुरक्षेचे उपाय करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, किल्ले रायगडावर येणाऱ्या पर्यटकांच्या आपत्कालीन सुविधेसाठी ‘कार्डियाक – रुग्णवाहिका’ मिळणे आवश्यक असल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत मिळणार,अखेर खरिपापूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनीही या सगळ्या घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महाड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अवसरमोल यांच्यासह त्यांची टीम दाखल झाली आणि जेसीबीच्या सहाय्यानं दरड बाजूला हटवण्यात आली.
Eknath Shinde : युतीला तडे जाण्याची भीती, शिंदेंच्या शिवसेनेची आता नवी जाहिरात; फडणवीसांना मानाचं पान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed