भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्या कांदिवली पूर्व विधानसभेतील विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी हे आश्वासन देण्यात आले. घराऐवजी २५ ते ४० लाख रुपयांचा पर्यायही प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. यावेळी भातखळकर यांनी मतदारसंघातील विविध
प्रकल्पांमुळे विस्थापित होणाऱ्या नागरिकांचा प्रश्न उपस्थित केला.
विशेष नियोजन आराखड्यातील मागाठाणे-गोरेगाव या १२० फूट रस्त्याबाबतही चर्चा करण्यात आली. हा रस्ता आगामी एक ते दीड वर्षात पूर्ण करावा, असे आदेश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. हा रस्ता पूर्ण होताच वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
घर किंवा आर्थिक रक्कम स्वीकरण्याचा पर्याय
भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या पुढाकारानं प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं देण्यात येतील असं उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. फडणवीस यांनी त्यासंदर्भात तसे आदेश देखील दिले आहेत. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना घरांऐवजी आर्थिक रक्कम हवी असल्यास त्यासंदर्भातील पर्याय देखील समोर ठेवण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्तांना घरांच्याऐवजी २५ ते ४० लाख रुपयांची रक्कम देण्याबाबत पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.
अतुल भातखळकर यांच्याकडून मतदारसंघातील प्रश्न सोडवल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यात आले. भातखळकर यांनी कांदिवली मतदारसंघातील विविध प्रश्न मांडले. मागठाणे गोरेगाव रस्त्याबाबत देखील यावेळी चर्चा झाली.
मतदारसंघातील महत्त्वाच्या समस्यांचा निपटारा केल्याबद्दल आमदार भातखळकर यांनी फडणवीस यांचे आभार मानले. बैठकीस नगरविकास, गृहनिर्माण, महापालिका, म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन, शिवशाही पुनर्वसन यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.