• Sat. Sep 21st, 2024

विठुरायासाठी धर्माच्या भिंती ओलांडल्या, वारकऱ्यांची मालिश करणाऱ्या मुस्लिम सेवेकऱ्याची सर्वत्र चर्चा

विठुरायासाठी धर्माच्या भिंती ओलांडल्या, वारकऱ्यांची मालिश करणाऱ्या मुस्लिम सेवेकऱ्याची सर्वत्र चर्चा

पुणे : जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे. या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरीही पुण्यात दाखल झाले आहेत. या वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम अनेक जण करत असतात. जो तो आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करतो.
Pandharpur Wari 2023: अवघा रंग एक झाला, जी-२० चे सदस्य वारीच्या भक्ती रंगात रंगले, पुण्यात माऊली माऊलीचा गजर…

मात्र मुळचे पुण्याचे मात्र सध्या हैद्राबाद येथे स्थायिक असणारे अब्दुल रजा हे गेल्या वीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करत आहेत. सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते वारकऱ्यांची सेवा करतात. वारकऱ्यांची मालिश करून वारकऱ्यांचे दुःख दूर करण्याचे काम करतात. अब्दुल रजा हे मूळ हैदराबादला राहायला गेलेले असले तरी दरवर्षी न चुकता हैदराबादहून ते पुण्याला साखळीपीर तालीम मंडळात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी येत असतात. तसेच अनेक वारकरी त्यांची सेवा घेण्यासाठी न चुकता येत असतात.

वारीत दिसला कर्तव्य अन् भक्तीचा संगम

या सेवेबाबत अब्दुल रजा म्हणतात की, वारकऱ्यांची सेवा करून मला आनंद मिळतो. माझा मालिश करण्याचा व्यवसाय असल्यामुळे मी बनवलेल्या तेलाचे ब्रॅण्डिंग हे होत असते. म्हणून ह्या पंढरीच्या वारीच्या सणात दरवर्षी वारकऱ्यांचे सेवा करण्यासाठी या ठिकाणी येत असतो. मनात कुठलाही समतोल न ठेवता सेवा हीच धर्म या भावनेने अब्दुल रजा गेले वीस वर्ष वारकऱ्यांची न चुकता सेवा करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed