• Sat. Sep 21st, 2024
VIDEO : अंगावर जखमा, डोळ्यांत भीती; आळंदीत वारकऱ्यांसोबत काय घडलं? तरुणाने सगळंच सांगितलं!

आळंदी, पुणे : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला गालबोट लागणारा प्रकार समोर आला आहे. रविवारी दुपारी चारच्या सुमारास पोलीस आणि वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली. माऊलींच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी वारकरी आग्रह धरत होते. मात्र, ठराविक क्षमतेपेक्षा अधिक संख्येने वारकऱ्यांना आत सोडणे शक्य नसल्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला. यावेळी वारकऱ्यांनी पोलीस बंदोबस्तावरील कर्मचारी आणि बॅरिकेट्स ढकलून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. त्यामुळे पोलिस आणि वारकऱ्यांमध्ये वाद झाला. वारकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमारही केला. वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांकडून वारकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला. या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरणही तापत आहे. तसंच पोलिसांकडून मारहाण झालेल्या वारकऱ्याचा एक व्हिडिओ समोर आला असून या माध्यमातून वारकऱ्याने आपबीती सांगत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.

Shivsena Vs BJP: भाजप-शिवसेनेतील धुसफूस वाढली, त्या पोलीस अधिकाऱ्यावर भाजपचे गंभीर आरोप, ईडी चौकशी लागणार?

वारकऱ्यांवर कोणताही लाठीमार झाला नसून, केवळ झटापट झाल्याचा दावा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केला आहे. मात्र तरुण वारकरी विशाल पाटील यांनी पोलिसांचा हा दावा खोडत आपल्या अंगावर झालेल्या जखमा दाखवल्या आहेत. तसंच आम्हा चार वारकऱ्यांना पोलिसांनी बाजूच्या एका घरात नेऊन मारहाण केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

विशाल पाटील यांनी म्हटलं आहे की, ‘मी जोग महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे. जळगाव येथील राहणारा आहे. आम्ही पालखीला दरववर्षी येतो. आम्हाला प्रस्थान सोहळ्याला दरवर्षी सोडतात. मात्र पोलिसांचं अचानक ठरलं की, आम्हाला आत सोडायचं नाही. आम्हा चार वारकऱ्यांना २० पोलिसांनी मारहाण केली. आमच्यावर हात उचलला. भविष्यात इतर वारकऱ्यांवरही ते हात उचलू शकतात. पोलिसांनी आम्हाला मारहाण का? केली या प्रश्नाचे उत्तर त्यांनी द्यावं,’ अशा शब्दांत या तरुण वारकऱ्याने आपला संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, वारकऱ्यांना झालेल्या लाठीमाराबाबत आता राज्यभरातून निषेध व्यक्त केला जाऊ लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed