मला नाही वाटत याला भाकरी फिरवणे म्हणतात, ही नुसती धूळफेक आहे, ही त्यांची अंतर्गत बाब आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस नागपुरात बोलत होते. फडणवीस पुढे म्हणाले, मी नागपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा दौरा करत आहे. केंद्र, राज्य शासनाच्या सर्व योजना, शासकीय दारी योजना, घरकुल योजनेची माहिती, तसेच लोकांच्या वैयक्तिक समस्या, अडचणी यांचा आढावा घेतला. या आढाव्यामुळे गोष्टी पुन्हा रुळावर आल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री फडणवीस यांनी रामटेक आणि पारशिवनी या दोन तालुक्यांचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांच्या ना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या असून, फडणवीस जिल्ह्यातील तहसील स्तरावरील विकासकामे व योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेत आहेत. रामटेकच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर व पारशिवनी तहसील, अधिकाऱ्यांची कामगिरी हा अनेक योजनांमध्ये समाधानाचा घटक नसून अशा अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.यानंतरही अधिकाऱ्यांच्या कामात बदल न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
फडणवीस यांच्याकडे नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचीही जबाबदारी आहे. वेळोवेळी ते आढावा घेत असतात. त्यांनी विधानसभा, तहसील स्तरावर केंद्र व राज्याच्या योजनांतर्गत सुरू झालेल्या कामांचा आढावा घेतला. रामटेक येथील बैठकीनंतर फडणवीस म्हणाले की, या आढावा बैठकांमुळे कामे होतात.
कामांमध्ये काही त्रुटी समोर आल्या आहेत, त्या दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही योजनांच्या कामाचा वेग मंदावला आहे. या योजनांशी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यानंतरही जर अधिकारी सुधारत नाहीत आणि कामाला गती दिली नाही तर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून या बैठकीनंतर कामाला गती येईल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.