शेख यांनी अतारांकित प्रश्नाचे उत्तर पारदर्शीपणे मिळावे अशी मागणी केली होती. माहिती अधिकारामध्ये त्यांना गुरुवारी या प्रश्नाचे उत्तर मिळाले असून या उत्तरामध्ये हवेत तरंगणाऱ्या धुळीकणांची (पीएम १०) पातळी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि ऑक्टोबर २०२२ या महिन्यांमध्ये निर्धारित मानकापेक्षा जास्त असल्याचे नमूद करण्यात आले होते. पीएम २.५ या धुलिकणांची पातळी जानेवारी ते मार्चदरम्यान अधिक होती.
जैववैद्यकीय कचऱ्याचा हा प्रकल्प जून २०२३ पर्यंत खालापूर येथे हालवणे अपेक्षित होते. तिथे प्रकल्पासाठी काही परवानग्या बाकी असल्याने याचे काम तिथे सुरू झालेले नाही असे शेख यांनी सांगितले. गोवंडीमध्ये या प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणासाठी इतर मतदारसंघाचे आमदार पुढाकार घेत आहेत, मात्र गोवंडीच्या आमदारांनीही प्रत्यक्ष नागरिकांच्या आरोग्यासाठी सक्रीय व्हावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
अशी आहे समस्या
– कार्बन मोनॉक्साइडची पातळीही जानेवारी ते एप्रिल २०२२ या कालावधीत निर्धारित मानकांपेक्षा अधिक होती. ही प्रदूषके निर्धारित मानकांपेक्षा जास्त आहेत.
– लोकांनी सातत्याने या प्रदूषकांमुळे त्रास होत असल्याचे सांगूनही यावर उपाययोजना केली जात नाही असे स्थानिकांचे म्हणणे.
– या परिसरामध्ये जो कचरा जाळला जातो, त्यावरही कारवाई होणे अपेक्षित आहे.