• Sat. Sep 21st, 2024

घरात घुसून वारंवार अत्याचार, नंतर जीवे मारण्याची धमकी, तरुणीने आरडाओरड केला अन्…

घरात घुसून वारंवार अत्याचार, नंतर जीवे मारण्याची धमकी, तरुणीने आरडाओरड केला अन्…

डोंबिवली : कल्याणमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणमध्ये एका तरुणीवर घरात घुसून तरुणाने वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्याण पूर्व भागातील पिसवली परिसरात ही घटना घडली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सागर याला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर पीडित तरुणीही कल्याण जवळील पिसवली आपल्या बहिणीच्या कुटुंबासोबत राहते.
पडीक इमारतीतील बिअर पार्टी जीवावर बेतली; नवी मुंबईत १९ वर्षीय तरुणीचा आठव्या मजल्यावरून पडून मृत्यू

तीन वर्षांपूर्वी या पीडित तरुणीने दहावीच्या परीक्षेचे टेन्शन घेतल्याने तिचे मानसिक संतुलन बिघडले होते. औषध उपचारानंतर तिची तब्येत सुधारत चालली होती. काही महिन्यांपूर्वी पीडितेची बहीण आजारी असल्याने ती गावाला गेली होती. बहिणीचे पती कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर पीडिता घरी एकटीच असायची. ही संधी साधत शेजारी राहणाऱ्या सागर याने तिची छेड काढण्यास सुरुवात केली. महिनाभरापूर्वी सागरने तिच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करण्याचा देखील प्रयत्न केला. तिने आरडाओरड केल्याने तो तेथून निघून गेला.

विकृतीचा कळस! सुंदर दिसते म्हणून पत्नीला पंधरा वर्षांपासून मारहाण

मात्र त्याने पीडितेला धमकवल्याने पीडिता घाबरली होती. त्यानंतर काही दिवसांनी सागरने पुन्हा तिच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने त्याच दिवशी वारंवार तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडिता घाबरली होती. त्यामुळे तिने याची वाच्यता कुठेच केली नाही. सागरने पीडिता घराबाहेर पडली असता भर रस्त्यात तिची छेड काढली. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. पीडितेच्या बहिणीच्या पतीने सागरला याचा जाब विचारला असता त्याने व त्याच्या कुटुंबाने त्यांची माफी मागितली. मात्र त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा सागरने कुटुंबाला धमकावले. अखेर या धमकावल्याप्रकरणी पीडितेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी नराधम सागरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed