• Sun. Sep 22nd, 2024

मुंबईकरांनो, सावधान! यंदाही ‘लेप्टोस्पायरेसिस’चा धोका कायम; अशी लक्षणं दिसताच सावध व्हा…

मुंबईकरांनो, सावधान! यंदाही ‘लेप्टोस्पायरेसिस’चा धोका कायम; अशी लक्षणं दिसताच सावध व्हा…

म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया यांच्याबरोबरच लेप्टोस्पायरेसिसचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान महापालिकेच्या आरोग्य विभागापुढे आहे. मागच्याच आठवड्यात दोन लेप्टोचे लक्षण असलेले रुग्ण मुंबईत आढळले आहेत. हा धोका पावसाळ्यात अधिक वाढू नये, यासाठी पालिका प्रशासनाने अधिक काळजी घेण्याचे ठरवले आहे.मागील आठवड्यात दोन रुग्णांवर लेप्टोस्पायरेसिसच्या लक्षणांसाठी उपचार करण्यात आले. खासगी रुग्णालयांत नोंद झालेल्या एका रुग्णाचे वय साठ तर दुसऱ्या रुग्णाचे वय २८ वर्षे होते. स्थानिक डॉक्टरांकडे तीन दिवस उपचार घेतल्यानंतरही त्यांच्या तापाची तीव्रता कमी झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात सीपीके चाचणीमध्ये पातळी वाढलेली असून प्लेटलेटची संख्या कमी झालेली आढळली. तसेच पांढऱ्या पेशींची संख्याही अधिक असल्याचे या चाचण्यांमध्ये दिसून आले. या रुग्णांना प्रतिजैविके देण्यात आली होती. या रुग्णांचा पाण्याशी संपर्क आला होता.

छातीतली सायलेंट कळ अ‍ॅसिडिटी नसून हार्ट अटॅक असू शकते; जाणून घ्या लक्षणं अन् चाचणी…

… अशी लक्षणे दिसताच सावध व्हा

-मुंबईत पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून राहते. अशावेळी खासगी तसेच सार्वजनिक रुग्णालयांमध्ये पाण्यातून चालल्यामुळे पायाला जखमा होऊन त्यातून लेप्टोस्पायरेसिसचा धोका वाढतो.
-शरीराचे तापमान बदलते. त्या बदलेल्या तापमानाशी जुळवून घेताना आजाराची तीव्रता वाढते. थंडी, ताप यामुळे अंगदुखी तसेच डोकेदुखीचा त्रास वाढतो.
– कोणताही ताप डेंग्यू, मलेरिया किंवा ‘लेप्टोस्पायरोसिस’ असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– ज्या व्यक्ती पावसाच्या ‌साचलेल्या पाण्यातून एकदाच चालल्या आहेत, पायावर जखम नसेल अशा व्यक्ती लेप्टोच्या अनुषंगाने ‘कमी जोखीम’या गटात मोडतात. तरीही त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून औषधोपचार घ्यावेत.
-लेप्टोबाधित प्राण्यांच्या लघवीद्वारे संसर्गित झालेल्या पाण्याशी संबंध येताच मनुष्याला ‘लेप्टोस्पायरोसिस’ची बाधा होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed