नवी मुंबई: नवी मुंबई मधील एनआरआय पोलीस ठाण्यात हद्दीत बेलापूरमधील सेक्टर १५ येथील एका जुन्या इमारतीतील आठव्या मजल्यावरून पडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळच्या वेळी घडली. या घटनेने संपूर्ण संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एक १९ वर्षीय तरुणी आपल्या मित्राच्या घरी मागील दोन दिवसापासून राहत होती.गुरुवारी सकाळी मित्राने त्याच्या मित्राला घरी बोलावून पार्टी करायचा बेत आखला, घरीच बिअर आणले. मात्र तरुणी आणि तरुणींच्या मित्राने घरी नको म्हणून बाहेर जाऊन पिण्याचे सांगितले. तोपर्यंत तरुणीच्या मित्रांनी दोन बिअर पिल्या. घरी आई येईल म्हणून बेलापूरमधील एका पडीक इमारतीच्या सातव्या मजल्यावर जाऊन पार्टी रंगली, अर्ध्यावर तरुणीचा मित्र लघु शंकेला उठून बाजूला गेला असता तरुणी त्याच्या मागून गेली आणि पाय घसरून खाली पडली, यात तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी येथे माहिती घेतली असता प्राथमिक माहितीप्रमाणे मयत तरुणीने अर्धी बिअर प्यायली असल्याचा संशय पोलिसांना आला, त्यामुळे तिचा पाय घसरून पडली असावी यात तिचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी दिली. सीबीडी-बेलापूर सेक्टर १५ मधील एका बंद अवस्थेतील जुनाट इमारतीत ही तरुणी मित्रासोबत फिरायला गेली होती. दोघेही इमारतीच्या आठव्या मजल्यावर गेले होते. या वेळी इमारतीत असलेल्या डक्टचा अंदाज न आल्याने तरुणीचा तोल जाऊन ती खाली पडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशी महापालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

तरुणी नक्की पाय घसरून पडली की तिला मारण्यात आले याचा शोध पोलीस घेत आहे. तपासात काय निष्पन्न होते हे आता त्यांच्या चौकशीनंतर स्पष्ट होईल. मात्र पार्टी करण्याच्या नादात तरुणीने आपला जीव गमावला असल्याने कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे.