• Sat. Sep 21st, 2024
पोलीस दलात खळबळ! अप्पर एसपीच्या नावाचं फेक फेसबुक अकाउंट; अन् घडला धक्कादायक प्रकार

जळगाव : सायबर गुन्हेगारांनी तर आता हद्दच पार केली आहे. जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे फेसबुकवर बनावट खातं उघडून त्यावरुन इतरांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर इतरांकडून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे. या प्रकरणी बुधवारी सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, “कुठलीही शहानिशा केल्याशिवाय माझ्या नावाने उघडलेल्या फेसबुकच्या खात्यावरुन पैशांची मागणी करणाऱ्यांना प्रतिसाद देऊ नये”, असं आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केलं आहे.

ज्येष्ठ पत्रकार अरुण फणशीकर यांचा मृत्यू; घराच्या विहिरीत सापडला मृतदेह, शहरात एकच खळबळ
२८ मार्चपासून आजपावेतो कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चंद्रकांत गवळी यांचे फेसबुकवर बनावट खाते उघडून लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहे. तसेच त्याद्वारे पैशांची मागणी करत आहे. बुधवारी हा प्रकार समोर आल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी प्रकाराची माहिती घेतली. यात खरोखर कुणीतरी बनावट नावाने खाते उघडून पैशांची मागणी करत असल्याचे समोर आलं.

त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयातील रायटर अजय शांताराम पाटील (वय ३६, रा. नवीन पोलीस कॉलनी) यांनी चंद्रकांत गवळी यांच्यातर्फे जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर करत आहेत.

दरम्यान, सायबर गुन्हेगारांनी थेट अप्पर पोलीस अधीक्षकांचे बनावट खाते तयार करत पैशांची मागणी केली असून सायबर पोलिसांसमोर हे मोठं आव्हान आहे. तर दुसरीकडे अप्पर पोलीस अधीक्षकांच्याच बनावट खात्याच्या या प्रकारामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. दरम्यान, बनावट खाते तयार करुन आव्हान देणाऱ्या या गुन्हेगाराला सायबर पोलीस शोधून काढतात का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

नवजात अर्भकाच्या तोंडाला चिकटपट्टी, सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील संतापजनक प्रकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed