• Mon. Nov 25th, 2024
    भाजपचे मिशन लोकसभा सुरु, ४८ तगड्या नेत्यांवर मतदारसंघांची जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी

    BJP mission loksabha election : शिवसेना आणि भाजपचे उमेदवार लोकसभा-विधानसभा निवडणुकीत निवडून यावेत, म्हणून या निवडणूक प्रमुखांकडे त्या त्या मतदारसंघानुसार जबाबदारी देण्याचा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती आहे

     

    हायलाइट्स:

    • भाजपकडून लोकसभा आणि विधानसभेची जोरदार तयारी
    • महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर
    • भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केली यादी
    मुंबई : भाजपने मिशन लोकसभा आणि विधानसभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. विनय सहस्त्रबुद्धे यांना ठाणे, मुरलीधर मोहोळ यांना पुणे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी सुमित वानखेडे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे.

    मंगलप्रभात लोढा, पराग अळवणी, प्रसाद लाड, धनंजय महाडिक, विनय सहस्रबुद्धे, मुरलीधर मोहोळ, राहुल कुल, महेश लांडगे यासारख्या भाजपच्या प्रसिद्ध नेत्यांवर लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    निवडणुका आल्या की शरद पवारांचे डायलाॅग सुरु, आम्हालाही सवय झाली; देवेंद्र फडणवीसांनी डिवचलं

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी शनिवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत खासदार आणि आमदारांचा देखील समावेश होता. शिवसेना आणि भाजपचे उमेदवार निवडून यावे म्हणून या निवडणूक प्रमुखांकडे त्या त्या मतदारसंघानुसार जबाबदारी देण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याची माहिती आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेच्या २८८ मतदारसंघांतही अशेच निवडणूक प्रमुख नियुक्त करण्यात येणार आहेत.

    कोण कोण निवडणूक प्रमुख?

    मुंबई उत्तर – योगेश सागर
    मुंबई उत्तर पश्चिम – अमित साटम
    मुंबई उत्तर पूर्व – भालचंद्र शिरसाट
    मुंबई उत्तर मध्य – पराग अळवणी
    मुंबई दक्षिण मध्य – प्रसाद लाड
    मुंबई दक्षिण – मंगलप्रभात लोढा
    ठाणे – विनय सहस्रबुद्धे
    मावळ – प्रशांत ठाकूर
    रत्नागिरी- सिंधुदुर्ग – प्रमोद जठार
    कोल्हापूर – धनंजय महाडिक
    हातकणंगले – सत्यजीत देशमुख
    सांगली – दीपक शिंदे
    सातारा – अतुल भोसले
    सोलापूर – विक्रम देशमुख
    माढा- प्रशांत परिचारक
    जालना – विजय औताडे
    लातूर – दिलीप देशमुख
    छत्रपती संभाजीनगर – समीर राजूरकर
    दिंडोरी – बाळासाहेब सानप
    वर्धा – सुमीत वानखेडे
    पुणे – मुरलीधर मोहोळ
    बारामती – राहुल कुल
    शिरुर – महेश लांडगे

    वाचा संपूर्ण यादी जशीच्या तशी

    BJP Loksabha Team

    BJP Loksabha Team 2

    BJP Loksabha Team 3

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed