• Sat. Sep 21st, 2024

Nagpur News : प्रत्येकाला मिळावे विषमुक्त अन्न; शासनाकडून गरजूंना देण्यात येणारे स्वस्त धान्य आता मोफत

Nagpur News : प्रत्येकाला मिळावे विषमुक्त अन्न; शासनाकडून गरजूंना देण्यात येणारे स्वस्त धान्य आता मोफत

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : अन्नधान्याबाबत असलेले परावलंबित्व दूर करून आपला देश अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. आपली गरज भागवून निर्यातही वाढू लागली आहे. प्रत्येकाला दोन वेळचे अन्न मिळावे, यासाठीचे उद्दिष्ट घेऊन यशस्वी वाटचाल सुरू झाली असली तरी; आपण खातो ते अन्न किती सुरक्षित असा प्रश्नही उपस्थित करण्यात येतो. त्यामुळेच नैसर्गिक शेती करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. आज ७ जून, ‘जागतिक अन्नसुरक्षा दिना’च्या पार्श्वभूमीवर याचा विचार करणे तितकेच अपरिहार्य झाले आहे.देशातील १९७१-७२च्या काळातील दुष्काळाचे वास्तव आजही सांगितले जाते. या संकटातून देश बाहेर निघावा यासाठी उत्पादन वाढीवर भर देण्यात आला. कृषिसंशोधनातून अत्याधुनिक बियाण्यांचा जन्म झाला. हरितक्रांतीने कृषिउत्पादनाचे नवनवे उच्चांक गाठले. मात्र रासायनिक शेतीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे आता अधिक लक्ष वेधण्यात येत आहे. नैसर्गिक शेती, किटकनाशकाचा वापर कमी करण्याकडे कल वाढत आहे. याचाच भाग म्हणून शासनाने जैविक कार्यालय सुरू केले.

परंपरागत कृषी विकास योजना, नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणारी योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हाती घेण्यात आली आहे. शासनाने भरडधान्याचे वर्ष जाहीर करून ज्वारी, बाजरी, भगर, नाचणी या पिकांच्या उत्पादन वाढीबरोबर आजच्या फास्टफूडच्या काळात त्याचे महत्त्व पटावे यासाठी जनजागृती हाती घेतली, जिल्ह्यातही अशा योजना राबविण्यात येत असल्याचे विभागीय अधीक्षक, कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी सांगितले. कुणीही उपाशी राहू नये यासाठी शासनाकडून गरजूंना देण्यात येणारे स्वस्त धान्य आता मोफत देण्यात येत आहे.

पुणेकरांनो जिंका ५ कार, १५ ई-बाइक, १५ मोबाइल आणि १० लॅपटॉप, बघा काय आहे महापालिकेची योजना
जिल्ह्यातील कृषी क्षेत्र

– जिल्ह्यात ४ लाख ८० हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे.

– रब्बीचे क्षेत्र १ लाख ७५ हजार आहे.

– खरिपाचे क्षेत्र रब्बीमध्ये परावर्तीत करून ‘डबल क्रॉपिंग’चे प्रयोग राबविण्यात येणार आहेत.

उत्पादन क्षमता

भात : २५ क्विंटल प्रती हेक्टर

गहू : १० ते १२ क्विंटल प्रती हेक्टर

तूर : ८ ते १० क्विंटल प्रती हेक्टर

हरभरा : १२ ते १४ क्विंटल प्रती हेक्टर

सुरक्षित अन्नासाठी याकडे लक्ष द्या

– उघड्यावर मिळणारे खुले अन्नपदार्थ खाणे शक्यतो टाळा

– हॉटेलमध्ये जात असल्यास बसण्याच्या जागेसोबतच किचनही तपासा

– मिठाई खरेदी करताना ‘बेस्ट बिफोर’चा उल्लेख असेल तरच खरेदी करा

– फास्ट फूड शक्यतो टाळा आणि सकस आहार घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed