यामध्ये वाहनाचे आणि हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. तर यात पाटील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने जमावाला पांगवण्यासाठी तसेच स्वसंरक्षणासाठी मयूर पाटील यांनी हवेत दोन राउंड गोळीबार केल्याची माहिती आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षकांसह पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेमुळे मध्यरात्रीच्या सुमारास शासकीय रुग्णालयासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या घटनेप्रकरणी नगरसेवक मयूर पाटील यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात ११ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयाजवळ काँग्रेस नगरसेवकाचे एमपी रेसिडेन्सी हॉटेल आहे.
त्या हॉटेलशेजारी क्रीडांगणाची मोकळी जागा असून याठिकाणी रात्रीच्या सुमारस नशेखोरीचा प्रकार सुरू होता. याची माहिती मिळाल्यावर मयूर पाटलांनी त्यांना हाकलून देत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यांनतर पोलिसांनी कारवाई करून नशेखोर तरुणांना सोडून दिले. या रागातून त्यांनी मुलांना बोलवून नगरसेवक मयूर पाटलांच्या हॉटेलवर हल्लाबोल केला. यावेळी नशेखोर तरुणांनी हॉटेल आणि मयूर पाटील यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. ज्यामध्ये गाडीच्या काचा फुटल्या,तर याठिकाणी असणारे नगरसेवक मयूर पाटील यांच्या अंगावरही टोळक्याने धावून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर मयूर पाटील यांनी त्यांच्या स्वतः जवळ असणारी रिव्हॉल्व्हर बाहेर काढत हवेत गोळीबार करत दोन राऊंड फायर केले. यामुळे घटनास्थळी पळापळ सुरू झाली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवले. मात्र या घटनेने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. रात्री २ वाजेपर्यंत हा सर्व प्रकार सुरू होता.