• Sat. Sep 21st, 2024
आईनं जीव जाईस्तोर मारलं; पण निष्पाप लेकरू मरणाच्या दारातून परत येऊन मायकडेच धावलं; नेमकं काय घडलं?

म. टा. वृत्तसेवा, नाशिक (मनमाड) : पाच वर्षांच्या लहानग्या लेकराला मनोरुग्ण आईने जीव जाईस्तोर मार मारले…पण, निष्पाप लेकरू मरणाच्या दारातून परत येऊनही पुन्हा वात्सल्य हरवलेल्या तिच्या मायकडेच धावलं…एवढ्याशा पोरीला निर्दयीपणाने मारताना आईचं मन द्रवलं तर नाहीच पण परराज्यातून मनमाडला आलेल्या त्या मनोरुग्ण महिलेकडे पुन्हा तिचं लेकरू सोपविण्याला खाकी वर्दीतील सहृदयताही तयार झाली नाही. अखेर तीन दिवस नाशिक जिल्हा रुग्णालयातील उपचारानंतर तेलंगणा येथून त्या लहानगीचे वडील व इतर नातेवाईक मनमाड येथे आल्यावर मंगळवारी रात्री त्या मुलीला त्यांच्या ताब्यात देण्याचे सोपस्कार पार पडले.

एका बाजूला ‘माता न तू वैरिणीचा’ प्रत्यय देत लहानग्या लेकराच्या जिवावर उठलेली माता, तर रक्ताचे नाते नसताना पाच महिन्यांच्या चिमुरडीचे दुःख पाहून मदतीसाठी पुढे सरसावलेली विलास कटारे व सहकाऱ्यांमधील माणुसकी या प्रसंगात दिसून आली. दुसरीकडे मनोरुग्ण महिलेवर कठोर कारवाई करताना हतबल झालेले पोलिस प्रशासनही पाहायला मिळाले.

हातात फायलींचा गठ्ठा, महत्त्वाची कागदपत्रे, शरद पवार अचानक मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला
मनमाडमध्ये चार दिवसांपूर्वी कॅम्प भागात चार वर्षांच्या मुलीला निर्दयपणे जीव जाईपर्यंत एका महिलेने मारले. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते विलास कटारे यांना कळल्यावर त्यांनी त्या लहानगीला येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. गांधी यांच्या रुग्णालयात दाखल केले. पोटच्या गोळ्याचा जीव घेण्यासाठी सरसावलेली ती माता म्हणजे लक्ष्मी उर्फ गंगामणी मलया मोकल तेलंगणा येथून मनमाडला मुलीला घेऊन आली. ती मनोरुग्ण असल्याचे पोलीस तपासात समोर आले. एवढ्याशा बाळाच्या अंगावर इतक्या जखमा पाहून सारेच हादरले. पण, एवढे शारीरिक घाव सोसूनही ते लेकरू मातेकडेच पुन्हा पुन्हा धावत होते.

खाकीतील माणुसकीचे दर्शन

मनमाडहून नंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात त्या बाळाला पाठविण्यात आले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी सोबत पोलीस बंदोबस्तदेखील दिला. मनोरुग्ण महिलेच्या घरचा पत्ता, दूरध्वनी शोधून कुटुंबीयांना माहिती दिली. लहानग्याचा भाऊ, वडील मावडी खुर्द ता. बोधन जि. निजामाबाद येथून मनमाडला आले. मुलीला आणि आईला नाशिकहून मनमाडला आणण्यात आले. अखेर मंगळवारी रात्री चिमुरडीला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात, पोलीस नाईक धुमाळ व महिला शिपाई उषा पवार यांनी चिमुरडीला सुरक्षित ठिकाणी रवाना करीत खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन घडविले.

पार्थ पवारांच्या पराभवाचं शल्य कायम, मावळमधून बारणेंना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची लेक भिडणार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed