• Sat. Sep 21st, 2024
विलास लांडे यांच्या ‘भावी खासदार’ प्रकरणावर कोल्हेंची ‘पॉवरफुल्ल’ प्रतिक्रिया

पुणे : शिरूर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली की काय अशीच लगबग सध्या आहे. कारण भोसरीचे राष्ट्रवादीचे नेते विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरुरमध्ये त्यांचे भावी खासदार असे बॅनर लागले आहेत. त्यावर आता राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही, पवार साहेब सांगतील ते धोरण अन् बांधतील ते तोरण… अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे. विलास लांडे हे कोल्हे यांच्या जवळचे सहकार्य म्हणून ओळखले जातात. त्या पार्श्वभूमीवर कोल्हे यांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष सागलं होतं.

भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरुरमध्ये भावी खासदार म्हणून त्यांचे सर्वत्र पोस्टर लागले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतच लोकसभेसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. शरद पवार यांनी त्यांच्या मनातली दोन नावे शिरूर लोकसभेसाठी सांगितली होती. त्यात दिलीप वळसे पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे हे होते. मात्र विलास लांडे यांचे बॅनर लागल्याने तिसरा नेताही स्पर्धेत असल्याचं समोर आलं.

लोकसभेसाठी ठाकरे गटाने १८ जागांवर दावा केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडून समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र राष्ट्रवादीतून आणखी एका नेत्याने खासदारकीसाठी दावा केल्याने एकच चर्चा सुरू झाल्या आहेत.

अमोल कोल्हे यांनी विलास लांडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत भावी खासदारकीसाठी शुभेछा दिल्या आहेत. कुणालाही महत्वाकांक्षा असणं गैर नाही. कारण असं म्हणतात शर्यत अजून संपली नाही अन् मी अजून जिंकलो नाही. २०१९ साली शरद पवार आणि जनतेने दाखवलेल्या विश्वासामुळे मला संधी दिली. ही टर्म संपण्यासाठी अजून काही दिवस अवधी आहे, आपण असं म्हणतो की रीले शर्यत जिंकण्यासाठी आपल्याला आपली रेष गाठायची असते. २०१९ साली मायबाप मतदारांनी माझ्यावर दाखवलेला विश्वा सार्थ करण्यासाठी यापुढील काळातही मी कार्यरत असेल,

याबाबत अकारण चर्चा करण्यापेक्षा शरद पवार साहेब जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. मतदारांची कामे करण्यासाठी येणाऱ्या काळात पवार साहेब सांगतील ते धोरण अन् बांधतील ते तोरण ही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची ठाम भूमिका आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

शिरुर लोकसभेसाठी इच्छुकांची मोठ्ठाली यादी; राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याची बॅनरबाजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed