• Thu. Nov 28th, 2024

    सहा वर्षांची मुलगी बनली आपल्या आईवडिलांच्या नात्यातील दुवा; नव्याने उभारला संसार

    सहा वर्षांची मुलगी बनली आपल्या आईवडिलांच्या नात्यातील दुवा; नव्याने उभारला संसार

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : लग्नानंतर एका वर्षातच विभक्त राहू लागलेल्या दाम्पत्याला त्यांच्या सहा वर्षांच्या चिमुकलीने पुन्हा एकत्र आणले. विशेष म्हणजे, आई-वडील विभक्त झाले, तेव्हा त्या चिमुकलीचा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे हे दाम्पत्य एकत्र आल्याने त्या चिमुकलीने तिच्या जन्मानंतर तब्बल सहा वर्षांनी पित्याला पाहिले. पहिल्यांदाच भेटल्यानंतर चिमुकली ‘पप्पा’ म्हणाली अन् पित्याच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले.सागर (वय ३६) आणि सागरिका (वय ३२, दोघांची नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. हे दोघेही अभियंता असून, सागर हा मूळचा तमिळनाडू येथील आहे, तर सागरिका पुण्यात राहते. त्यांचा २०१५मध्ये विवाह झाला. लग्नानंतर दोघेही पुण्यातच राहत होते. त्यानंतर वर्षभरातच किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाले. त्यामुळे सागर तमिळनाडूला येथे निघून गेला. त्या वेळी सागरिका गरोदर होती. तीदेखील माहेरी गेली. तेव्हापासून (२०१६) दोघे विभक्त राहू लागले. सागरिकाने २०१७मध्ये मुलीला जन्म दिला.

    Pune News: ‘PMO कार्यालयाचा तो अधिकारी’ पुण्यात गोपनीय मिशनवर, संशय येताच डॉ. विनय देव यांचं बिंग फुटलं
    दरम्यानच्या काळात सागरने तमिळनाडू येथील न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला होता, तर सागरिकाने नांदायला तयार असल्याचा दावा पुणे न्यायालयात दाखल केला होता. तिने स्वतःसाठी आणि मुलीच्या संगोपनासाठी पोटगीची मागणीही केली होती. तमिळनाडू येथील घटस्फोटाचा दावा पुणे न्यायालयात हस्तांतरित करण्याची विनंती, सागरिकाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यानुसार तो खटला पुण्यात चालविण्यास परवानगी मिळाली. त्या खटल्यासाठी सागर पुण्यात हजर झाला. त्या वेळी नियमानुसार त्याचे समुपदेशन करण्यात आले. मात्र, त्याने काही फरक पडला नाही. सागरिकाला घटस्फोट देण्यासाठी तिला चेन्नई येथील फ्लॅट आणि दागिने मिळून एक कोटी रुपयांची संपत्ती देण्याची तयारी सागरने न्यायालयात दर्शविली.

    ती नांदण्यावर ठाम

    सागरला घटस्फोट हवा होता तरीही, सागरिका नांदण्यावरच ठाम होती. दोघांना त्यांच्या वकिलांनी समजावून सांगितले. त्यांना करण्यात आलेल्या समुपदेशनात त्यांची चिमुकली मुलगी समान धागा होती. त्या वेळी ते दोघे एकत्र राहण्यास तयार झाले. त्यांनी नव्याने संसार सुरू केला. त्यानंतर एकमेकांच्या विरोधातील खटले काढून मागे घेतले. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश पी. बी. येरलेकर यांच्या न्यायालयात या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

    समुपदेशनामुळे सात वर्षांपासून वेगळे राहणारे पती-पत्नी एकत्र येत, त्यांनी नव्या जोमाने पुन्हा संसार सुरू केला आहे. त्यामुळे त्यांच्या मुलीचे भविष्यही सुखकर बनणार आहे. समुपदेशन हे मानवासाठी वरदान आहे. समुपदेशनामुळे बऱ्य़ास त्रासातून सुटका होते.

    – राणी कांबळे-सोनावणे, पतीच्या वकील

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed