• Mon. Nov 25th, 2024
    लग्न मंडपात रिक्षा घुसली, धडकेत वऱ्हाडी ठार; बुलढाण्यात वातावरण तापले

    बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात लग्न समारंभ सुरु होता. यादरम्यान, लग्न समारंभाच्या मंडपात भरधाव ऑटो रिक्षा घुसली. रिक्षा घुसल्याने दोन वऱ्हाडी जखमी झाले. यातील एक पुरुष वऱ्हाडी गंभीर जखमी झाल्याने त्याला सुरुवातीला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात पुढील उपचारासाठी घेऊन जात होते. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. रामू सावरकर असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेमुळे सजनपुरी परिसरात रात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

    बस अर्ध्यापर्यंत कापली गेली, बुलढाणा अपघातात ६ जणांनी गमावले प्राण

    रिक्षाचालकाच्या चुकीने झालेल्या अपघातात जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू झाल्याने सजनपुरी परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच या प्रकरणात हस्तक्षेप करत परिसरात दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

    ट्रॅक्टरने दुचाकीला उडवले; भीषण अपघातात मायलेकीचा मृत्यू, वडिलांसह दुसरी मुलगी जखमी, मेहकरमधील घटना
    मागील काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये अनेकदा अशांतता निर्माण करण्याची प्रकरणे समोर येत आहेत . दोन दिवसापूर्वीच राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांवर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसवर अज्ञातांकडून तुफान दगड फेक करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच काल रात्री राष्ट्रीय महामार्ग नजीकच्या पुलाखालील दुकानांना अज्ञातांनी आग लावल्याची घटना घडली. त्यातच काल रात्री लग्न समारंभामध्ये ऑटो रिक्षा घुसल्यानंतर तणाव निर्माण झाला. मागील दोन दिवसापासून घडणारे असे प्रकार खामगाव शहराला अशांत करण्याचे काम करीत आहेत.
    सामान्यांच्या लालपरीचे आरोग्य व्हेंटिलेटरवर! एसटीला ५० किमीसाठी दोन तास, गतिमान सरकारच्या काळात एसटीची दुर्दशा
    मागील अनेक वर्षांपासून हे गाव शांतता आणि सलोखा राखण्यात पुढाकार घेत होते. पण मागील दोन दिवसांच्या घटनेमुळे इथे मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा शांतता आणि सलोखा निर्माण करण्याकरिता पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलणे गरजेचे आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *