• Mon. Nov 25th, 2024

    तरुणपणी व्यावसायिक होण्याचं स्वप्न, पण गणित चुकलं अन् अर्ध्यावरच डाव मोडत मृत्यूला जवळ केलं!

    तरुणपणी व्यावसायिक होण्याचं स्वप्न, पण गणित चुकलं अन् अर्ध्यावरच डाव मोडत मृत्यूला जवळ केलं!

    नागपूर : कामठी येथील लवेश लॉरेन ऑरेंज सिटी टाऊनशिपच्या मागे राहणाऱ्या एका तरुण व्यावसायिकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्जाला कंटाळून तरुण व्यावसायिकाने जीवन संपवलं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आयुष अजय त्रिवेदी (२६) असे मृत तरुणाचे नाव आहे. आयुष त्रिवेदी हा सावनेर-कामठी परिसरात बांधकाम साहित्य पुरवण्याचे काम करत होता. त्याच्याकडे काही ट्रक आणि पोकलँड होते. व्यवसायात तोटा झाल्याने आयुष गेल्या काही दिवसांपासून कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे तो तणावात होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजता नवीन कामठी येथे उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार, आयुषचे वडील अजय त्रिवेदी हे पत्रकार असून ते कामठी बस्ती येथे आपल्या कुटुंबासोबत भाड्याच्या घरात राहत होते. मंगळवारी सकाळी घरातील सर्व सदस्य हॉलमध्ये बसले होते, त्यावेळी आयुष त्याच्या खोलीत होता. दरम्यान, त्याच्या खोलीतून गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यानंतर घरच्यांनी खोलीकडे धाव घेतली. दरवाजा उघडून बघितला तेव्हा आयुष रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता.

    पुण्यातला संचेती पुलावर शोले स्टाईल आंदोलन; सिग्नलला शेकडो वाहने थांबली, चौकात तासभर फुल्ल ड्रामा

    दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले.

    बंदूक आली कुठून? चौकशी सुरू

    आयुषच्या आत्महत्येसाठी वापरलेली बंदूक कुठून आली, याबाबत पोलीस तपास करत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed