• Sat. Sep 21st, 2024
भरधाव कारने इंजिनिअरला उडवलं, चालक जागीच गाडी सोडून पळला, आई-बाबांचा एकुलता एक आधार गेला

धुळे : शेतात पायी जाताना भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने मागून जोरदार धडक दिली. अपघातात चिमठाणे (ता. शिंदखेडा) येथील इंजिनिअर तरुण जागीच ठार झाला. ही थरारक घटना चिमठाणे-साळवे कच्च्या रस्त्यावर घडली आहे. प्रथमेश ऊर्फ पप्पू भीमराव अहिरे-धनगर असे मयत तरुणाचे नाव आहे. प्रथमेश हा एकुलता असल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर चिमठाणे गावावर शोककळा पसरली आहे. शिंदखेडा पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.मैत्री ठरली प्रणयसाठी जीवघेणी, पट्टीचा पोहणारा मुलगा बुडाला कसा? कुटुंबाच्या संशयाने गूढ उकललं
दुपारी दीड वाजताच्या सुमारास चिमठाणे ते साळवे कच्च्या रस्त्यावर चारचाकी वाहनाने (एमएच १८, डब्ल्यू १२७३) प्रथमेश ऊर्फ पप्पू भीमराव अहिरे-धनगर (वय २३) चिमठाणे गावाकडून शेतात पायी जात होता. यावेळी त्याला मागून जोरदार धडक दिली. यात त्याच्या छातीला, पोटाला व डोक्याला जबर मार लागल्याने तो जमिनीवर पडला. यानंतर चारचाकी चालक वाहन सोडून पळून गेला.

बस अर्ध्यापर्यंत कापली गेली, बुलढाणा अपघातात ६ जणांनी गमावले प्राण

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गावकऱ्यांना पाहताच चारचाकी वाहन चालकाने आपले वाहन त्या ठिकाणी सोडून पळ काढला, त्यानंतर प्रथमेशला १०८ रुग्णवाहिकेने चिमठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले.

आई-वडिलांना हरिद्वार यात्रेसाठी रेल्वेत बसवलं, चालत्या ट्रेनमधून उतरताना पडून लेकाचा मृत्यू
शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन वाघ यांनी प्रथमेश यास तपासून मृत घोषित केले. प्रथमेशचे चुलत काका संतोष हिलाल धनगर-अहिरे यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सदेसिंग चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed