• Sat. Sep 21st, 2024
Pune VIDEO: भरधाव बाईकने थेट हवेत उडवलं, महिलेचा मृत्यू; सीसीटीव्हमधील क्षण पाहून धडकी भरेल….

पुणे : पुणे शहरात कर्वेनगर परिसर व उपनगरामध्ये अल्पवयीन मुलांकडून बेभान पद्धतीने गाड्या चालवल्या जातात. हीच मस्ती एका महिलेच्या जीवावर बेतली असून तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तर पोलिसांकडून युवकावर कारवाई करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रंजना प्रकाश वसवे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. कर्वेनगर परिसरात एक महिला रस्ता ओलांडत असताना समोर भरधाव वेगात येणाऱ्या एका दुचाकी चालकाने महिलेला उडवले. या अपघातात महिला उडून पडली होती. गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित महिला ही श्रीकृष्ण मित्र मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते समीर वसवे यांच्या मातोश्री होत्या.

लग्नात पाहिलं अन् एकमेकांवर भाळले, लॉजवर भेटताच प्रेमभंग; पुण्याच्या तरुणीसोबत शेगावात घडलं भयंकर

डंपरची धडक, आमदार लता सोनवणे आणि माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या गाडीला अपघात!

पुण्यात अनेक ठिकाणी भरधाव वाहन चालविणाऱ्या, सायलेन्सर व कर्णकर्कश हॉर्नमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी रहिवाशी करत आहेत. कर्वेनगर येथील हिंगणे होम कॉलनीत सध्या अनेक तरुण अशा भरधाव गाड्या चालवत आहेत. गाड्यांची रेसिंगही लागलेली पाहायला मिळते. या सगळ्याचा परिसरातील नागरिकांना भयंकर त्रास होत असून यावर उपाययोजना करणं फार गरजेचं आहे. अशा तरुणांवर त्वरित कारवाई करणे फार गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पाटील कुटुंबात ३५ वर्षांनंतर आनंदी आनंद, सेलिब्रेशनसाठी मागवले हत्ती, ढोल-ताशे; पंचक्रोशीत चर्चा
पुढील अशाच प्रकारचे अपघात टाळण्यासाठी याच्यावर ठोस अशी उपाययोजना करणे फार गरजेचे आहे. जनजागृती करणे, ठीक ठिकाणी बोर्ड-बॅनर लावणे ही काळाची गरज आहे. महत्त्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर लावणे जरी अडचणीचे ठरणार असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने ते अत्यंत गरजेचे आहे.

Crime News: कोल्हापूर पोलिसांना संशय, सापळा रचला; गाडी थांबवून उघडताच फुटला घाम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed