सांगळे कुटुंबातील मोठी मुलगी ज्योती हिने पोलीस भरतीसाठी तयारी सुरू केली. पोलीस भरतीसाठी सराव सुरू असताना भाऊ अमोल आणि बालाजी यांनीही भरतीसाठी तयारी सुरू केली. दोन्ही भावंड आणि बहीण आपल्या घराच्या परिसरातच भरतीसाठी मेहनत घेऊ लागले. धावण्याचा सराव उड्या मारणे व्यायाम करणे, गोळा फेक असा सराव सुरू असतानाच भरतीच्या परीक्षेचेही तयारी केली. आणि अखेर त्यांच्या मेहनतीने त्यांना त्यांच्या यशापर्यंत पोहोचवले.
नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत बहीण ज्योतीची आणि भाऊ अमोल यांची मुंबई पोलीस दलात भरती झाली. त्यांचा लहान भाऊ बालाजी याने याच दरम्यान, भारतीय सैन्य दलाची परीक्षा दिली होती. आणि त्यात त्याला यश मिळाल्याने सैन्य दलात त्याची निवड झाली. सिन्नर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुले पोलीस दलात आणि सैन्य दलात भरती झाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.