शिरूर : शिरूर तालुक्यातील ढोक सांगवी गावच्या एका हौशी तरुणाने पाच महिन्यांची एक घोडी २५ हजाराना विकत घेतली. त्या घोडीला चक्क महागड्या असणाऱ्या फॉर्च्युनर कार मधून आणले आहे. या घटनेचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.उत्तर पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे बैलांची देखील तेवढीच काळजी घेतली जाते. मात्र बैलाबरोबरच घो़डीला धेकील त्याच्या बरोबरीने महत्त्व आहे. बैलगाड्या पुढे पळताना घोडीला ठेवावेच लागते. कारण बैलांना रस्ता दाखवण्यासाठी आणि बैलांपेक्षा घोडीचा वेग अधिक असतो. त्यामुळे घोडीचा देखील शर्यतीत मोठा उपयोग होत असतो.
ढोक सांगवी येथील किरण दगडू पाचांगे यांनी अहमदनगर जिल्ह्यातून एक पाच महिन्यांची असलेली घोडी विकत घेतली. पांचागे हे बैलगाडा शौकीन आहेत. त्यांचा स्वतःचा बैलगाडा देखील आहे. त्यामुळे गाद्याच्या पुढे धावण्यासाठी ही घोडी विकत घेतल्याचे पाचंगे यांनी सांगितले आहे.
ढोक सांगवी येथील किरण दगडू पाचांगे यांनी अहमदनगर जिल्ह्यातून एक पाच महिन्यांची असलेली घोडी विकत घेतली. पांचागे हे बैलगाडा शौकीन आहेत. त्यांचा स्वतःचा बैलगाडा देखील आहे. त्यामुळे गाद्याच्या पुढे धावण्यासाठी ही घोडी विकत घेतल्याचे पाचंगे यांनी सांगितले आहे.
बैलापुढे घोडी पळण्याच्या दोन्ही बैलांना चाव-हेकरी म्हणतात. या बैलगाड्या पुढे बैलांना दिशा देण्याचं काम घोडी करत असते. ही घोडी खूप चपळ असावी असं प्रत्येकाला वाटत असतं. घोडी मूळेच बैल शर्यती जिंकतो असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे अशी घोडी आपल्याकडे असावी असे प्रत्येक बैलगाडा मालकाला वाटत असते. याच नादातून धोक संगवीच्या बैलगाडा मालकाने ही घोडी आणली आहे.
हे घोडीचं लहान शिंगरू (पिल्लू ) आणून त्याची लहानपनापासून काळजी घेत तिला शर्यतीसाठी तयार केलं जातं. या परिसरात घाटात पळणाऱ्या बैलांना जशी लाखांची किंमत मिळते, तशीच घोडीला सुद्धा लाखो रुपयांची किंमत मिळते.
मात्र त्यांनी फॉर्च्युनर गाडीतून तिला आणल्याने तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.