आज विरोधी पक्षनेते अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रम आणि उद्घाटनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्या पूर्वी त्यांनी पुण्यातल्या टिंबर मार्केट येथे लागलेल्या भीषण आगेच्या घटनास्थळी त्यानी जाऊन भेट दिली. त्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांचा मुलगा गौरव बापट किंवा सून स्वरदा बापट यांना तिकीट दिलं गेल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल अशा देखील चर्चा सुरु आहेत. प्रशासनानं देखील याबाबत हालचाली सुरु केलेल्या आहेत. यापूर्वी ही जागा काँग्रेसकडे होती. आता पोटनिवडणूक जाहीर झाल्यास या जागेवरुन कोण निवडणूक लढवणार हे पाहावं लागेल.
अजित पवार म्हणाले की, एक वर्ष राहिलं असताना मला वाटत होतं की पुण्याची पोटनिवडणूक लागणार नाही, पण बहुतेक खासदार बापट साहेबांच्या निधनानंतर ती पण पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे, अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे, असं अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी पोट निवडणूक लढवण्याची इच्छा आहे का ? या प्रश्नावर अजित पवार यांनी उत्तर दिलं की, राष्ट्रवादीची ताकद इतर पक्षाच्या तुलने मध्ये आम्ही दाखवली आहे. म्हणून आता जी निवडणूक लागेल जिथे आमच्या मित्र पक्षांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी, अशी माहिती देखील अजित प