• Mon. Nov 25th, 2024

    काका पुतण्यामध्ये पुन्हा संघर्ष, आशिष देशमुखांनी आव्हान दिलं पण अनिल देशमुखांनी परतवलं

    काका पुतण्यामध्ये पुन्हा संघर्ष, आशिष देशमुखांनी आव्हान दिलं पण अनिल देशमुखांनी परतवलं

    Anil Deshmukh : नागपूरमध्ये आमदार अनिल देशमुख आणि माजी आमदार आशिष देशमुख या काका पुतण्यांमधील संघर्ष पुन्हा वाढला आहे. नरखेड बाजार समितीत आशिष देशमुख यांच्याकडून अविश्वास ठराव आणला गेला होता. पण, अनिल देशमुखांनी अनुभव पणाला लावत सभापतीपद आपल्या गटाकडे कायम ठेवलं.

     

    हायलाइट्स:

    • आशिष देशमुखांना धक्का
    • अनिल देशमुखांची मोठी खेळी
    • नरखेड बाजार समिती ताब्यात ठेवली
    नागपूर : नरखेड बाजार समितीत अनिल देशमुख यांच्या गटाचे सभापती सुरेश आरघोडे यांच्या विरोधात आशिष देशमुख यांच्या गटाने अविश्वास ठराव आणला होता. नरखेड बाजार समितीच्या राजकारणाकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते. या स्पर्धेत अनिल देशमुख यांच्या गटानं बाजी मारली. काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, यानंतर लगेचच आशिष देशमुख यांनी काका अनिल देशमुख यांच्याविरोधात रान उठवले.

    नरखेड बाजार समिती अनिल देशमुख यांच्या ताब्यात आहे. मात्र, अनिल देशमुख यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी नरखेड बाजार समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव मांडला होता. मात्र, ही बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे. नरखेड बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख यांच्या गटाचे सभापती सुरेश आरघोडे यांच्या विरोधात आशिष देशमुख यांच्या समर्थकांनी अविश्वास ठराव आणला होता. अविश्वास ठरावादरम्यान सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.
    IPL 2023 : जिथून सुरुवात झाली तिथंच…, मुंबई आयपीएलच्या बाहेर जाताच चेन्नईचं भन्नाट ट्विट चर्चेत
    १८ सदस्यीय नरखेड बाजार समितीच्या अविश्वास ठरावाच्या प्रक्रियेत एकूण १६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात आशिष देशमुख यांच्या गटाच्या बाजूनं १० तर अनिल देशमुख यांच्या गटाच्या उमेदवाराला ६ मतं मिळाली. यामध्ये अनिल देशमुख यांच्या गटानं बाजी मारली. अविश्वास ठराव १२ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी मांडला होता. त्यापैकी एका मतदाराच्या बाबतीत कोर्टाचा आदेश आल्यानं त्याचं मत मोजलं गेलं नाही तर दुसऱ्या एका मतदाराचं मत अवैध ठरलं त्यामुळं अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेला १२ आकडा गाठण्यात आशिष देशमुख यांच्या गटाला अपयश आलं.. त्यामुळे नरखेड बाजार समितीच्या सभापतीपदी अनिल देशमुख गटाचे सुरेश आरघोडे कायम राहणार असल्याचे निश्चित झाले.
    पाटील आडनावाचा वाद : सुषमा अंधारे यांची गौतमीसाठी रोखठोक पोस्ट, फुल्ल सपोर्ट!
    अनिल देशमुख आणि आशिष देशमुख यांच्यात राजकीय संघर्षाची ही पहिलीच वेळ नव्हती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काटोल मतदारसंघातून आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली होती. जिथे काकांचा मोठ्या फरकाने पराभव करून पुतण्या आमदार झाला. मात्र, नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर २०१९ मध्ये पुन्हा निवडणूक जिंकून काका आमदार झाले. २०१९ ला आशिष देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, नुकतीच त्यांच्यावर काँग्रेसमधून निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर त्यांनी काकांविरोधात डाव टाकला होता पण तो अयशस्वी झाला.
    मध्य रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; मध्यरात्रीपासून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *