• Sat. Sep 21st, 2024
पती-पत्नी शेतात काम करण्यासाठी गेले, घरी परतलेच नाहीत, सत्य कळताच संपूर्ण गाव हादरले

बीड: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात वाघुळच येथील पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली आहे. मात्र ही आत्महत्या कशामुळे घडली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ईश्वर गुंड असे या मृत पतीचे नाव असून त्यांच्या मृतदेह रात्री उशिरा शेतात आढळला. तर, पत्नीचा मृतदेह सकाळी शेतामध्ये आढळून आला. ही घटना उघड झाल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे.बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेलं वाघळुज येथील ईश्वर गुंड (वय ३२ वर्षे) यांची पत्नी देखील याच गावातील रहिवासी आहेत. यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला. काल आपल्या शेतात काम करण्यासाठी दोघेही घरातून बाहेर पडले. मात्र, उशिरापर्यंत हे दोघे आलेच नाहीत. यामुळे घरातील नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली.

महिला देवदर्शनाला जात होती, रस्त्यात गाठून तरुणाने पतीसमोर केली भलतीच मागणी, पती-पत्नी हादरले
यात रात्री उशिरा ईश्वर गुंड यांचा मृतदेह शेतामध्ये आढळून आला. त्यानंतर त्यांच्या पत्नीचा देखील पूर्ण शेतात शोध घेण्यात आला. मात्र रात्रीच्या अंधारात त्यांच्या पत्नीचा शोध लागला नाही मात्र सकाळी अज्ञात व्यक्तीच्या माहितीवरून त्यांच्या पत्नीचा ही मृतदेह त्यात शेतात गळफास घेतलेला आढळून आला. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दंपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र, ही आत्महत्या का केली याचं कारण गुलदस्त्यात आहे.

CSK vs GT: चेन्नई सुपर किंग्जचा IPL फायनलमध्ये जाण्याचा विक्रम, जाणून घ्या चेन्नई कितव्यांदा पोहोचला फायनलला?
असे असले तरी ही आत्महत्या आहे की हत्या हा देखील प्रश्न सध्या पुढे येत आहे. ईश्वर यांनी गावातीलच लमान समाजाच्या मुलीबरोबर आंतरजातीय विवाह केला होता. त्यांना एक मुल देखील आहे. मात्र गावात ही घटना कशी घडली…? ही नेमकी आत्महत्या आहे की हत्या, या गोष्टीवर सध्या चर्चा सुरू आहे. मात्र पोलिसांनी या दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

Ashish Deshmukh: जायंट किलर आशीष देशमुखांना मोठा झटका, काँग्रेस पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी, हे कारण
या घटनेचा तपास अंबरा पोलीस करत असून नेमकं काय प्रकार घडला याचा तपास स प्रशासन करणार असल्याचं अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितला आहे. मात्र या दुर्दैवी घटनेनंतर गावासह जिल्हा हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed