• Fri. Mar 13th, 2026

    भरत जाधवजी, माफी मागताना प्रेक्षकांचे काही पैसे परत केलेत का? उदय सामंत यांचा टोला

    भरत जाधवजी, माफी मागताना प्रेक्षकांचे काही पैसे परत केलेत का? उदय सामंत यांचा टोला

    रत्नागिरी : रत्नागिरी येथील नाट्यगृहात आपण पुन्हा पाय ठेवणार नाही, असे सांगत प्रेक्षकांची जाहीर माफी मागणारे प्रख्यात अभिनेते भरत जाधव यांच्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया दिली. भरत जाधव यांनी या गोष्टीचे नाहक भांडवल केले, त्याचा इव्हेंट करायचा की एपिसोड करायचा, हा त्यांचा प्रश्न आहे, असा टोला उदय सामंत यांनी लगावला आहे.

    काय म्हणाले उदय सामंत?

    “मी इकडे येणार नाही, मी तिकडे येणार नाही, पण असं काही होत नाही आणि ते न आल्यामुळे सांस्कृतिक चळवळ काही थांबणार नाही” अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी भरत जाधव यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 25 मे रोजी आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाबाबत माहिती देण्याकरता मंगळवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी येथे बोलत होते.

    ठरलं तर मग: एकाच बेडवर झोपायलाही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज येतंय आड; सायली- अर्जुनची अशी होणार फजिती
    ते पुढे म्हणाले की, सावरकर नाट्यगृहात कोणत्या त्रुटी असतील तर त्या नक्कीच दूर केल्या जातील. संयोजकांनी तीन तासाचे डिझेल टाकल्यानंतर ते चार तास पुरूच शकत नाही. कार्यक्रम किती वेळ चालवायचा हा संयोजकांचा विषय आहे. ज्यावेळेला आपण खातू नाट्यगृहात शो करत होतो, त्या वेळेला तुम्हाला कुठेही जायची तयारी होती, अशा स्वरूपाचा एका नाट्यरसिकाचा लेख आपण वाचला. आता वि. दा. सावरकर नाट्यगृहात अतिशय चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. भरत जाधव यांच्या नाटकाच्या आधी तीन दिवस मी त्याच ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांबरोबर कार्यक्रमासाठी होतो. त्यावेळेला एसीचा कोणताही त्रास आम्हाला झाला नाही, त्यामुळे आहे त्यापेक्षा उगाचच काहीतरी मोठे झाले आहे असं करून आविर्भाव आणत दाखवणं हे योग्य नाही’ अशा शब्दात उदय सामंत यांनी सुनावले आहे.
    होत्याचं नव्हतं झालं! साराभाई वर्सेस साराभाई फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचे कार अपघातात निधन
    ‘मीही सांस्कृतिक क्षेत्रात अनेक वर्ष काम करत आहे आपण या सगळ्या लोकांना अनेक वर्ष बघत आहे. भरत जाधव मला कॉल करून बोलू शकले असते. आठवड्याभरापूर्वी बेंगलोर येथे झालेल्या कार्यक्रमात भरत जाधव माझ्यासोबत होते. त्यासाठी त्यांना असा इव्हेंट करण्याची आवश्यकता नव्हती. पण तो शेवटी त्यांचा प्रश्न आहे. परंतु या सगळ्याची दखल नक्की घेण्यात आली असून काही त्रुटी असल्यास त्या नक्कीच दूर केल्या जातील’ अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. भरत जाधव यांनी माफी मागताना मला वाटलं त्यांनी प्रेक्षकांच्या तिकिटाचे काही पैसे परत दिले असतील, असाही टोला पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला आहे.

    मालिका विश्व शोकसागरात! अभिनेते नितेश पांडे याचं निधन

    मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभाग घ्यावा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
    ‘डायट’च्या माध्यमातून शिक्षणात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा- शिक्षणमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
    आगामी वर्षात सीपीआरमध्ये अत्याधुनिक उपचार पद्धती राबवणार – वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed