• Sat. Sep 21st, 2024

अंधश्रद्धेपोटी वाढली कासवांची तस्करी, इच्छापूर्तीसाठी २० आणि २१ नख असलेल्यांना पसंती

अंधश्रद्धेपोटी वाढली कासवांची तस्करी, इच्छापूर्तीसाठी २० आणि २१ नख असलेल्यांना पसंती

कासव घरात ठेवल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येते. चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करते. नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर ठेवण्यासाठी कासव ठेवावा, अशी अनेकांची श्रद्धा आहे. जिवंत कासव ठेवायचा असल्यास २० आणि २१ नख असलेल्या कासवांना विशेष पसंती आहे. लोकांमधील या समजुतींमुळे कासवांची तस्करी वाढली आहे.

 

turtle trafficking india
(आज जागतिक कासवदिन)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर

रखडलेली कामे पूर्ण व्हावीत, भरपूर पैसा मिळावा, आरोग्य चांगले राहावे यांसारख्या विविध इच्छांसाठी प्रत्येक जण आपापल्यापरीने कार्यरत असतो. मात्र, या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांची संख्या बरीच आहे. माणसांमध्ये वाढलेल्या या अंधश्रद्धेमुळे कासवांची तस्करी वाढल्याचे दिसून येत आहे.

Kolhapur Rain: लग्नात वरुणराजा बरसला, ३५० ते ४०० वऱ्हाडी असलेला मंडपच कोसळला, क्षणात होत्याचं नव्हतं…
गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून कासव, मांडूळ यांसारख्या प्राण्यांची मागणी वाढली आहे. गुप्तधनाचे आमिष दाखवून त्यांची तस्करी केली जाते. बऱ्याचवेळी या प्राण्यांची माहिती नसल्यामुळे त्यांना सर्रासपणे चुकीचे अन्न दिले जाते. त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. परिणामी आता कासव, मांडूळ, खवल्या मांजर हे प्राणी दुर्मिळ होत चालले आहेत. अंधश्रद्धेमुळे कासवांची तस्करी जास्त होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर कासवाची मागणी असेल या खोट्या आशेपोटी प्राण्यांची तस्करी व शिकार केले जाते. आर्थिक अडचण असलेले किंवा झटपट पैसे कमविण्यासाठी हा मार्ग निवडला जातो. कासवांच्या सुमारे २५० जाती आहेत. वास्तुविशारदतज्ज्ञ तसेच ज्योतिषी घरात जिवंत वा काच, धातू, लाकूड यांपासून बनविलेला कासव ठेवण्याचा सल्ला देतात. कासव घरात ठेवल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येते. चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करते. नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर ठेवण्यासाठी कासव ठेवावा, अशी अनेकांची श्रद्धा आहे. जिवंत कासव ठेवायचा असल्यास २० आणि २१ नख असलेल्या कासवांना विशेष पसंती आहे. लोकांमधील या समजुतींमुळे कासवांची तस्करी वाढली आहे.

यांचा वापर सर्वाधिक

साधारणपणे तस्करी होत असलेल्या कासवांमध्ये स्टार टॉरटॉइज, इंडियन टेंट टर्टल, इंडियन रूफ टर्टल या जातींचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यातील इंडियन टेंट टर्टल, इंडियन रूफ टर्टल या कासवाच्या जाती अतिधोकादायक प्रकारात मोडत असून यातील एकही कासव महाराष्ट्रात आढळत नाही. कासव व अन्य प्राणीविक्रीचा ऑनलाइन बाजार जोरात असल्याचे यापूर्वीच्या काही घटनांवरून सिद्ध झाले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed