• Mon. Nov 25th, 2024
    Accident News: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कंटेनरचा ब्रेक फेल, लागोपाठ ७ वाहनांना उडवलं; गाड्यांचा भूगा

    लोणावळा, पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने वाहनाने एकापाठोपाठ ७ वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. खोपोलीजवळ असणाऱ्या लेनवर हा अपघात झाला असल्याची माहिती आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे – मुंबई महामार्गावर सोमवारी रात्रीच्या साधारण सव्वा अकराच्या सुमारास कंटेनर क्र. आर की १९ जी एच ४४९७ हा रस्त्यावरून वेगात जात होता. त्याचे अचानक ब्रेक फेल झाल्याने समोर असणाऱ्या ७ वाहनांना या कंटेनरने धडक दिली. यात इको कार (एम एच ०३ डी ए ८२३३), क्रेटा कार (एम एच ४३ बी एन ९११४), टाटा झेस्ट कार (एम एच १४ ई यू ३५२), हुंडाई कार (एम एच ४७ के ६११२ ), किया कार (एम एच ०३ ई बी ९७७७) आणि स्विफ्ट कार (एम एच ०२ बी एम ९०२२) या वाहनांना जोरदार वेगात धडक दिली आहे.

    टॉफी खाल्ली अन् तडफडू लागला ४ वर्षांचा चिमुरडा; आई-वडिलांच्या डोळ्यांदेखत गेला जीव; कारण धक्कादायक
    घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्यांनी जखमींना पनवेल येथील रुग्णालयात दाखल केले. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य ५ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर कंटेनर चालक घनास्थळवरून पळून गेला. मात्र, बोर घाटात पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान, अपघातानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पण पोलीस प्रशासनाने इतर वाहनांना वाट करून दिली.

    Vande Bharat : मुंबईकरांना वंदे भारत गिफ्ट, लोकल लवकरच होणार इतिहासजमा, वाचा काय आहे प्लॅनिंग

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *