सुदैवाने तिघे काठावरच पोहत असल्याने बचावली
सुदैवाने तिघे काठावरच पाण्यात पोहत असल्याने बचावले. काठावर असलेल्या तिघा मित्रांना दानीश व अंकुश हे दोघे बुडताना दिसले. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र दोघेही पाण्यातून वर आले नाहीत. मदत मिळेपर्यंत उशीर झाला होता. दोघे बुडाले होते. पट्टीच्या पोहणार्यांनी दोघांना बाहेर काढले. तातडीने रुग्णालयात हलविले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यावर मुलांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. या ठिकाणी मुलांच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे, पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांनीही घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
तापी नदी पात्रात गेल्या काही दिवसांमध्ये मुलांचा बुडून मृत्यू झालेल्या च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सध्या तापमानाचा पारा वाढल्यामुळे प्रचंड उकडाचा त्रास होत आहे व याच उकड्याच्या त्रासापासून काही प्रमाणात दिलासा मिळावा म्हणून तरुण तापी नदीपात्रात पोहण्यासाठी जातात. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने पोहण्यासाठी येणाऱ्या मुलांचा बुडून मृत्यूची दुर्घटना घडते. दरम्यान एकाच घटनेत दोन मुलं बुडाल्याच्या या घटनेने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.